Join us  

Video: 'दांडी - यात्रा'... 'सुपरफास्ट' शमीच्या दोन चेंडूत दोन विकेट्स, स्टंपच्या कोलांट्या उड्या !

Mohammed Shami, IND vs NZ : शमीने पहिल्याच सामन्यात घेतले ५ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 7:06 PM

Open in App

Mohammed Shami, World Cup 2023 IND vs NZ : न्यूझीलंडच्या संघाने विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताला २७४ धावांचे आव्हान दिले. मधल्या फळीतील डॅरेल मिचेलच्या १३० धावा आणि राचिन रविंद्रच्या ७५ धावांच्या बळावर न्यूझीलंडला ५० षटकांत २७३ धावांपर्यंतच मजल मारता आली. मिचेल-रविंद्र जोडी मैदानात असताना न्यूझीलंड ३०० पार सहज मजल मारेल असे वाटत होते. पण आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने पाच गडी बाद करून न्यूझीलंडला तीनशेपर्यंत मजल मारू दिली नाही. शमीच्या भेदक माऱ्यातील दोन 'क्लीन बोल्ड' चर्चेचा विषय ठरले.

भारताचे बहुतांश गोलंदाज आज न्यूझीलंडच्या एका जोडीपुढे हतबल ठरताना दिसले. अशा वेळी मोहम्मद शमीने मात्र आपल्या धारदार वेगवान गोलंदाजीची चमक दाखवली. ४८ वे षटक सुरू असताना, शमीने आपला भेदक मारा सुरूच ठेवला. त्याने चौथ्या चेंडूवर यॉर्कर टाकत मिचेल सँटनरचा त्रिफळा उडवला. तर पुढच्याच चेंडूवर मॅट हेन्रीची दांडी गुल केली. शमीच्या चेंडूचा वेग इतका होता की स्टंप अक्षरश: जमिनीतून उडखून फिरायला (यात्रेला) निघाल्यासारखा लांब गेला. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि विल यंग स्वस्तात बाद झाले. राचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने १५९ धावांची भागीदारी केली. राचिन ७५ धावांवर बाद झाला. त्यानंतर डॅरेल मिचेलला इतरांची अपेक्षित साथ मिळाली नाही. शेवटच्या टप्प्यात शमी आणि इतर गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत न्यूझीलंडच्या धावा अडवल्या. ग्लेन फिलिप्स (२३) वगळता सारेच एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. मिचेलने मात्र एकाकी झुंज सुरू ठेवली. त्याने ९ चौकार आणि ५ षटकारांसह १३० धावा केल्या. गोलंदाजीत मोहम्मद शमीने विल यंग, राचिन रविंद्र, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. त्याने १० षटकांमध्ये ५४ धावा देत ५ बळी मिळवले.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध न्यूझीलंडमोहम्मद शामीभारत