Rachin Ravindra, World Cup 2023 IND vs NZ Live Updates : वन डे विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि भारत यांच्यात आज धरमशाला येथे सामना सुरू आहे. सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी दोघांनी १-१ बळी घेत सुरूवातीला न्यूझीलंडला धक्के दिले. पण त्यानंतर भारतीय स्पिनर्सचा राचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने चांगलाच समाचार घेतला. भारतीय वंशाच्या राचिन रविंद्रचा जाडेजाने सोडलेला कॅच भारताला महागात पडला अन् त्याने दमदार अर्धशतक ठोकले.
राचिन रविंद्र १२ धावांवर खेळत होता. त्यावेळी मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर राचिनने चेंडू मारला. चेंडू अतिशय आरामात रविंद्र जाडेजाच्या दिशेने गेला. जाडेजासारख्या उत्तम फिल्डरकडून कॅच सुटेल असे कोणालाही वाटले नव्हते, पण जाडेजाने कॅच सोडला. तो कॅच घेतला असता तर राचिन १२ धावांवर माघारी परतला असता.
जाडेजाने सोडलेला झेल-
राचिनचा कॅच सुटल्यानंतर, त्याने चांगलाच हल्लोबोल केला. योग्य वेळी फटकेबाजी करत त्याने ५६ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार खेचला.
कोण आहे राचिन रवींद्र?
राचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती हे मुळचे बंगळुरुचे, तर त्याच्या आईचे नाव दीपा कृष्णमूर्ती. कृष्णमूर्ती त्यांच्या कामानिमित्त ९० च्या दशकात न्यूझीलंडला गेले आणि न्यूझीलंडमध्येच स्थायिक झाले. राचिनचा जन्म न्यूझीलंडमधील वेलिंग्टनचा आहे. राचिनचे वडील रवि कृष्णमूर्ती यांना क्रिकेटमध्ये खूप रस होता आणि त्यांनी वेलिंग्टनमध्ये स्वतःचा क्रिकेट क्लबही सुरू केला. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे चाहते असलेल्या राचिनच्या वडिलांनी या भारतीय दिग्गजांच्या नावांची अक्षरे मिसळून आपल्या मुलाचे नाव 'राचिन' ('रा'हुल + स'चिन') ठेवले.