Rohit Sharma Six, World Cup 2023 IND vs NZ Live : भारतीय संघाला न्यूझीलंडने २७४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले. भारताविरूद्ध डॅरेल मिचेलचे शतक (१३०) आणि राचिन रविंद्रचे अर्धशतक (७५) यांच्या बळावर न्यूझीलंडने २७३ धावांपर्यंत मजल मारली. मोठे आव्हान मिळाल्यावर कर्णधार रोहित शर्माने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरूवात केली. रोहितचे अर्धशतक हुकले. पण त्याच्या ४६ धावांच्या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचले. त्यातही त्याचा एक षटकार विशेष चर्चेत राहिला. सोशल मीडियावर या षटकाराची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसले.
रोहित शर्माने डावाच्या दुसऱ्याच षटकात मॅट हेन्रीला चोप दिला. पहिल्या चार चेंडूवर जपून खेळल्यानंतर पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने त्याला एक उत्तुंग षटकार लगावला. वेगवान गोलंदाजाला उसळत्या पिचवर पुढे चाल करून येणे आणि षटकार मारणे ही सोपी गोष्ट नसते. पण रोहितने अतिशय सहजपणे डावाच्या दुसऱ्याच षटकात पुढे येऊन त्याला उत्तुंग षटकार खेचला. चेंडू मैदानाच्या बाहेर जातो की काय असेही काही क्षण वाटावे इतका चेंडू वर हवेत गेला होता. पाहा तो षटकार-
दरम्यान, रोहितने आजच्या सामन्यात एकूण ४ षटकार खेचले. सारेच षटकार पाहण्यासारखे होते. त्यामुळेच साऱ्या षटकारांची चाहत्यांनी तोंडभरून स्तुती केली.
रोहितचे ४ षटकार-
भारत- रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड- डेवॉन कॉनवे, विल यंग, राचिन रवींद्र, टॉम लॅथम, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट