मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 लढतीदरम्यान पोटरीला झालेली दुखापत बळावल्याने रोहित शर्माला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीर मयांक अग्रवाल याला एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्याच आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज सकाळी याबाबतची घोषणा केली.
NZ vs IND : Rohit Sharmaची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार; हिटमॅनच्या कसोटी कारकिर्दीला मोठा धक्का
मोहम्मद शमीच्या घरी हलला पाळणा, जन्माला आली कन्या!
विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यानंतरही काही ४१ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी केल्यानंतर रोहित या लढतीतून रिटायर्ड हर्ट झाला होता. त्यानंतर रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान सोमवारी करण्यात आलेल्या एमआरआय स्कॅनमधून त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
भारत-न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक
वन डे भारत विरुद्ध न्यूझीलंड - 5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा. कसोटीभारत विरुद्ध न्यूझीलंड - 21 ते 25 फेब्रुवारी, पहाटे 4 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 29 फेब्रुवारी ते 4 मार्च, पहाटे 4 वा.