भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 आणि वन- डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारताने कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यातच आता न्यूझीलंडनेही कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. पण या संभाव्य संघातून एका खेळाडूने आपल्या बायकोला वेळ देण्यासाठी संघातून ब्रेक घेतला आहे.
न्यूझीलंडने जाहीर केलेल्या संघात सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टने पुनरागमन केले आहे. तसेच न्यूझीलंडने वेगवान गोलंदाज कायल जेमिन्सनला संधी दिली असून फिरकीपटू मिशेल सॅन्टनरला संघातून वगळण्यात आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 आणि वन- डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
न्यूझीलंडच्या संघातील नील वँगनरने बायकोला वेळ देण्यासाठी ब्रेक घेतला आहे. नीलची बायको पहिल्यांदाच गरोदर आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यावेळी आपण तिच्याजवळ असावे, असे नीलला वाटत आहे. त्यामुळे नीलने ही गोष्ट संघाला कळवली असून ब्रेक घेतला आहे. आता त्याच्याजागी मॅट हेनरीची निवड करण्यात येणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांचे संभाव्य संघ असे आहेत...
भारताचा कसोटी संघ: विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, नवदीप सैनी, इशांत शर्मा, मोहम्मद शमी
न्यूझीलंडचा कसोटी संघ: केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, रॉस टेलर, कॉलिन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, निल वॅगनर, बीजे वॉलटिंग, मॅट हेनरी.
Web Title: IND vs NZ: New Zealand player takes break from Test series to spend time with his wife
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.