IND vs NZ : न्यूझीलंडचा वन डे, ट्वेन्टी-२० संघ जाहीर; २ दिग्गजांना बसवले बाहेर

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा होणार आहे. यात एकदिवसीय तसेच टी20 सामना खेळवला जाणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:53 AM2022-11-15T08:53:43+5:302022-11-15T10:10:08+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ New Zealand's ODI, T20 squad announced2 veterans are out | IND vs NZ : न्यूझीलंडचा वन डे, ट्वेन्टी-२० संघ जाहीर; २ दिग्गजांना बसवले बाहेर

IND vs NZ : न्यूझीलंडचा वन डे, ट्वेन्टी-२० संघ जाहीर; २ दिग्गजांना बसवले बाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा होणार आहे. यात एकदिवसीय तसेच टी20 सामना खेळवला जाणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वनडेमध्ये न्यूझीलंडचा सामना करेल. न्यूझीलंडने मार्टिन गुप्टिल आणि ट्रेंट बोल्टसारख्या खेळाडूंना वनडे आणि टी-20 संघातून वगळले आहे. बोल्ट आणि मार्टिन हे न्यूझीलंडसाठी सर्वोत्तम खेळाडू ठरले आहेत.  (IND vs NZ)

टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले होते. किवी संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले, तर उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला.

टी-२० विश्वचषकानंतर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

Inzamam-Ul-Haq, Pakistan: इंझमाम-उल-हकने पाकिस्तान फलंदाजांची लाजच काढली, म्हणाला...

न्यूझीलंड T20 संघ: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.

न्यूझीलंड एकदिवसीय संघ: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउदी.

टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

वनडे साठी टीम इंडिया: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक. 

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ 

 रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक 

1 डिसेंबर - भारतीय संघ बांगलादेशला पोहचेल
4 डिसेंबर - पहिला एकदिवसीय सामना, ढाका
7 डिसेंबर - दुसरा एकदिवसीय सामना, ढाका
10 डिसेंबर - तिसरा एकदिवसीय सामना, ढाका
14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
27 डिसेंबर - भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी रवाना होईल. 

Web Title: IND vs NZ New Zealand's ODI, T20 squad announced2 veterans are out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.