IND vs NZ ODI : न्यूझीलंडच्या स्फोटक फलंदाजाचा मोठा निर्णय; भारताविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी मोडला करार 

India vs New Zealand ODI : भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकली. आता वन डे मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:38 PM2022-11-23T12:38:13+5:302022-11-23T12:38:38+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ ODI : New Zealand Cricket has agreed to release Martin Guptill from his central contract so he can pursue playing opportunities elsewhere | IND vs NZ ODI : न्यूझीलंडच्या स्फोटक फलंदाजाचा मोठा निर्णय; भारताविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी मोडला करार 

IND vs NZ ODI : न्यूझीलंडच्या स्फोटक फलंदाजाचा मोठा निर्णय; भारताविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी मोडला करार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand ODI : भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकली. पहिला  व तिसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला, परंतु दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला. आता वन डे मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. न्यूझीलंडच्या संघातील सर्वात यशस्वी खेळाडूने राष्ट्रीय संघटनेसोबत असलेला करार रद्द करण्याची केलेली विनंती मान्य केली गेली आहे. त्यामुळे हा फलंदाज आता जगतील अन्य लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

सूर्यकुमार यादव परवडणारा नाही, त्याच्यासाठी संघातील सर्वांना...! असं का म्हणतोय ग्लेन मॅक्सवेल?


भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेसाठी निवडलेल्या किवी संघात एक नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ट्वेंटी-२०त न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या मार्टीन गुप्तील ( Martin Guptill) याला भारताविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले. त्यामुळेच त्याने राष्ट्रीय करारातून स्वतःला वगळण्याची विनंती केली. यापूर्वी ट्रेंट बोल्ट व कॉलिन डी ग्रँडहोम यांनीही असाच निर्णय घेतला होता. जगभरातील अन्य लीगमध्ये खेळण्यासाठी या तिघांनी हा निर्णय घेतला. मार्टीन हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही संघाचा सदस्य नव्हता. ३६ वर्षीय मार्टीनला अजूनही निवड समिती त्याला संधी देईल अशी अपेक्षा आहे आणि म्हणून त्याने निवृत्ती घेतलेली नाही

 “देशासाठी खेळणे हा एक मोठा सन्मान आहे आणि मी ब्लॅक कॅप्स व न्यूझीलंड क्रिकेटमधील प्रत्येकाचा पाठिंब्याबद्दल आभारी आहे. मी सध्याच्या परिस्थितीत माझ्यासमोरील पर्यायांचा विचार करत आहे आणि ती सध्याची गरज आहे. मी करारमुक्त झालो असलो तरी अजूनही न्यूझीलंड संघाच्या निवडीसाठी उपलब्ध आहे. मला जगभरातीत अनेक लीगमध्ये संधी आहे आणि मला माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायला मिळतो, जे महत्त्वाचे आहे,” असे तो म्हणाला. 


गुप्टिल सध्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ब्लॅक कॅप्सकडून सर्वाधिक धावा करणारा आणि वन डे फॉर्मेटमध्ये तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले की, ''अनुभवी सलामीवीर मार्टिनला त्याच्या विनंतीनुसार करारातून मुक्त करत आहोत.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs NZ ODI : New Zealand Cricket has agreed to release Martin Guptill from his central contract so he can pursue playing opportunities elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.