Join us  

IND vs NZ ODIs : रिषभ पंत हा भारतीय संघावरील ओझं...! यष्टीरक्षकाला संघाबाहेर करण्याची माजी खेळाडूची मागणी

India vs New Zealand ODI : २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. पण, या मालिकेपूर्वी रिषभ पंतवर चौफेर टीका होत, कारण ट्वेंटी-२० मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 5:20 PM

Open in App

India vs New Zealand ODI : भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडवर १-० असा विजय मिळवला आणि आता शुक्रवारपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वन डे मालिका जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रिषभ पंत हा उप कर्णधार आहे आणि त्याला याही मालिकेत संधी मिळणार हे निश्चित आहेत. २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. पण, या मालिकेपूर्वी रिषभ पंतवर चौफेर टीका होत, कारण ट्वेंटी-२० मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

India Playing XI vs NZ 1st ODI: पदार्पणासाठी मलिक, अर्शदीप यांच्यात टक्कर; Sanju Samsonचं काय? पाहा कशी असेल प्लेइंग इलेव्हन

पंतने मागील १४ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये २४.२५च्या सरासरीने १९४ धावा केल्या आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रितिंदर सिंग सोढीने ( Reetinder Singh Sodhi) ने रिषभ पंतबाबत मोठं विधान केलं आहे. रिषभला बरीच संधी दिली गेली, परंतु त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही, असे सोढी म्हणाला. यंदाच्या वर्षात इंग्लंडमध्ये जुलै महिन्यात वन डे पदार्पणात त्याने शतक झळकावले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याला ११ व १३ धावा करता आल्या. त्यामुळेच भारतीय संघाने आता संजू सॅमसनला संधी द्यायला हवी, असे सोढीने म्हटले आहे. रिषभ हा भारतीय संघावरील ओझं झालेला असल्याचेही तो म्हणाला.  

''रिषभ पंत हा भारतीय संघावरील ओझं बनला आहे. आता संजू सॅमसनला संधी द्यायला हवी. सतत पराभव आणि वर्ल्ड कप किंवा आयसीसी स्पर्धेत होणारी मानहानी टाळण्यासाठी तुम्हाला असे निर्णय घ्यावे लागणार. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा अधिक संधी देता, तेव्हा समस्या निर्माण होते. आता नवीन खेळाडूला संधी देण्याची वेळ आली आहे. संजूला किती संधी मिळतात आणि किती वेळ मिळतो हे येणारा काळच सांगेल. पण आता वेळ निघून जात आहे आणि त्याने अजून  किती काळ बाकावर बसून राहायला हवं? प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. तुम्ही एका खेळाडूवर इतके दिवस अवलंबून राहू शकत नाही. जर तो कामगिरी करत नसेल तर तुम्हाला त्याला बाहेर करावे लागेल. त्याला बाहेरचा दरवाजा दाखवा,” असे सोढी म्हणाला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरिषभ पंतसंजू सॅमसन
Open in App