Join us  

IND vs NZ : बंगळुरुमध्ये पावसाची बॅटिंग; पहिल्या दिवसाचा खेळ पाण्यात?

पहिल्या दिवसाचा खेळ बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटी प्रमाणे वाया जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:08 AM

Open in App

India vs New Zealand 1st Test Toss Delayed Due To Rain In Bengaluru : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium, Bengaluru) खेळवण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी पावसाचा खेळ सुरु असल्यामुळे नियोजित वेळेत टॉसही होऊ शकलेला नाही. बंगळुरुमध्ये सध्या पावसाचा जोर कायम असून पहिल्या दिवसाचा खेळ बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटी प्रमाणे वाया जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

पाऊस थांबला की, सामना लवकरात लवकर सुरु करण सहज शक्य 

पावसामुळे बंगळुरुमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्या असताना देखील चाहते मोठ्या आशेनं सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थितीत आहेत. सध्याच्या घडीला पाऊस पडत असला तरी बंगळुरुच्या स्टेडियमवर कानपूरच्या तुलनेत मैदान खेळण्यासाठी पूर्ववत करण्याची सुसज्ज व्यवस्था आहे, याची चाहत्यांनाही कल्पना असावी. त्यामुळे चाहते पाऊस थांबल्यावर मॅच लवकरात लवकर सुरु होईल, या आशेनं मोठ्या उत्सुकतेनं क्रिकेटप्रेमी स्टेडियमवर बसून पाऊस थांबण्याची वाट पाहाताना दिसून येत आहे.  

इनडोअर टॉस घेण्याचा प्रयोग का शक्य नाही?

पावसामुळे टॉस लांबणीवर पडणं ही काही नवी गोष्ट नाही. याआधीही अनेकदा हे चित्र पाहायला मिळाले आहे. पावसाचा व्यत्यय आला तरी सामना खेळवायचाच असेल तर वेळेत टॉस घेण्यासाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनकरवी इनडोअर टॉस घेण्याचा प्रयोग का केला जात नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. क्रिकेटच्या नियमावलीनुसार, सामना सुरु होण्याआधी १५ ते ३० मिनिटे आधी नाणेफेक घेण्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळेच कसोटी असो वा मर्यादीत षटकांचा सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर वेळेत टॉस घेण्याचा प्रयोग करता येत नाही.  

न्यूझीलंडची खरी 'कसोटी'

भारतीय संघाचा घरच्या मैदानातील रेकॉर्ड एकदम मजबूत आहे. इथं टीम इंडियाला शह देणं सोप नाही. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ कधीच इथं कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. याआधी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे या संघासमोर ३ सामन्याची मालिका अधिक आव्हानात्मक असेल. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मान्यूझीलंडपाऊस