IND vs NZ : सचिन-द्रविडचा कॉम्बो! Rachin Ravindra नं करुन दाखवला खास पराक्रम

याआधी २०१२ मध्ये रॉस टेलरनं बंगळुरुच्या मैदानातच १०३ धावांची खेळी केली होती. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे दुसरे शतक आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:53 AM2024-10-18T11:53:24+5:302024-10-18T12:06:26+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs NZ Rachin Ravindra's hundred is the first by a New Zealand batter in India since Ross Taylor's 113 runs at the same venue in 2012 | IND vs NZ : सचिन-द्रविडचा कॉम्बो! Rachin Ravindra नं करुन दाखवला खास पराक्रम

IND vs NZ : सचिन-द्रविडचा कॉम्बो! Rachin Ravindra नं करुन दाखवला खास पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंडच्या ताफ्यातील उद्योत्मुख अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने बंगळुरुच्या मैदानात शतकी खेळीसह टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. एका बाजूनं भारतीय संघाने विकेट्सची गळती लावली होती. पण दुसऱ्या बाजूला त्याने गियर बदलून बॅटिंग करत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. रॉस टेलरनंतर भारतीय मैदानात शतक झळकवणारा तो न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी २०१२ मध्ये रॉस टेलरनं बंगळुरुच्या मैदानातच १०३ धावांची खेळी केली होती. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे दुसरे शतक आहे. 

बंगळुरु शहराशी खास नातं; रचिनच्या नावात दडलाय सचिन-द्रविड असा कॉम्बो

बंगळुरुच्या मैदानात अर्धशतकासाठी ८७ चेंडू खेळणाऱ्या रचिन रविंद्र याने १२४ चेंडूत शतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरच्या ५० धावा करण्यासाठी त्याने फक्त ३७ चेंडू खेळले. रचिन रविंद्र याचे बंगळुरु शहराशी खास नातं आहे. तो न्यूझीलंडकडून खेळत असला तरी त्याचे बंगळुरुशी खास नातं आहे. तो मूळचा बंगळुरुचा आहे. आई वडिल परदेशात स्थायिक झाल्यामुळे तो न्यूझीलंडच्या ताफ्यात दिसतो. आजही त्याची आजी  याच शहरात वास्तव्यास आहे.  न्यूझीलंडचा हा स्टार सचिन अन् द्रविड यांचा कॉम्बो आहे.  त्याच्या वडिलांनी  राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा सुरेख संगम साधत लेकाचं नाव रचिन असं ठेवलं होते. हे नाव आता भारतीय मैदानात गाजताना दिसत आहे.

वनडे कारकिर्दीतील पहिलं शतकही त्यानं बंगळुरुच्या मैदानातच मारलं

रचिन रविंद्रनं बंगळुरुच्या मैदानातच आपल्या वनडे कारकिर्दीतील शतक झळकावले होते. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने या मैदानात शतकी कामगिरी केली होती. आता कसोटी कारकिर्दीतील दुसर शतक झळकावत बंगळुरुतील आपल कनेक्शन किती स्ट्राँग आहे, याची झलकच त्याने दाखवून दिली आहे.

रचिन रविंद्र -साउदी जोडी जमली

न्यूझीलंडच्या संघाने ३ बाद १८० धावांवरुन पुढे तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. भारतीय संघाने पहिल्या तासाभरात ४ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडच्या संघाने २३३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर रचिन रविंद्र आणि टिम साउदी या जोडीनं धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला. दोघांनी आठव्या विकेटसाठी ९७ चेंडूत शतकी भागीदारी रचली. एका बाजूला रचिन रविंद्र शतक साजरे केले दुसऱ्या बाजूला उपहारापर्यंत साउदी ४९ धावांवर खेळत होता. न्यूझीलंडच्या संघाने २९९ आघाडी घेतली होती. 
 

Web Title: Ind vs NZ Rachin Ravindra's hundred is the first by a New Zealand batter in India since Ross Taylor's 113 runs at the same venue in 2012

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.