भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात विश्वविक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचताना रोहितने भारताच्या विराट कोहलीलाही पिछाडीवर सोडले आहे.
या सामन्यात कोहलीने विश्रांती घेतली होती. त्यामुळे या सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहितवर आली होती. मुख्य म्हणजे हंगामी कर्णधार असलेल्या रोहितने नाणेफेक जिंकली, त्याचबरोबर अर्धशतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
या सामन्यात रोहित दुखापतग्रस्त झाला. पण दुखापतग्रस्त होण्यापूर्वी रोहिने ६० धावांची खेळी साकारली होती. या अर्धशतकासह रोहितने विश्वविक्रम रचल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विश्वविक्रम आता रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितच्या खात्यामध्ये आता २५ अर्धशतके जमा झाली आहेत. यापूर्वी या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली हा २४ अर्धशतकांसह अव्वल स्थानावर होता. पण रोहितने मात्र आता कोहलीला पिछाडीवर सोडले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा सामनाही चांगलाच रंगतदार झाला. पण हा अखेरचा सामना जिंकण्यातही न्यूझीलंडला अपयश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या ट्वेन्टी-२० लढतीमध्येही भारताने विजय मिळवला आणि या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले.
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले. पण त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळणारा रॉस टेलर आणि टीम साइफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.
टेलर आणि साइफर्ट यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. नवदीप सैनीने साइफर्टला बाद करत ही जोडी फोडली, त्याने ३० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. साइफर्ट बाद झाल्यानंतर टेलरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अर्धशतक पूर्ण केले.
कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताला न्यूझीलंडपुढे १६४ धावांचे आव्हान ठेवता आले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामी कर्णधार रोहितने यावेळी संघाच्या क्रमवारीत बदल केला. युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. पण संजूला या संधीचा फायदा उठवता आला नाही आणि २ धावा करून तो बाद झाला.
संजू स्वस्तात बाद झाला असला तरी त्यानंतर रोहित आणि लोकेश राहुल यांनी संघाला डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. पण मोठा फटका मारण्याचा नादात तो बाद झाला. पण राहुल बाद झाला असला तरी रोहितने एका बाजूने जोरदार फटकेबाजी केली. रोहितच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
न्यूझीलंडच्या खेळाडूने मैदानात येतात लिहिला इतिहास, केला मोठा पराक्रमभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरचा ट्वेन्टी-२० सामना सुरु झाल्यावर लगेचच एक मोठी गोष्ट पाहायला मिळाली. मैदानात पाय ठेवताच न्यूझीलंडच्या एका खेळाडूने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडच्या या खेळाडूने पराक्रम केला असून तो देशाचा अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना आज खेळवण्यात येत आहे. या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. दरम्यान, या लढतीसाठी भारतीय संघात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. विराट कोहलीने विश्रांती घेतली असून, विराटऐवजी रोहित शर्मा आज भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
चौथ्या सामन्यात विश्रांती घेणाऱ्या रोहित शर्माने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. आजच्या लढतीसाठी भारतीय संघात केवळ एकमेव फेरबदल करण्यात आला आहे. तर संजू सॅमसन आणि नवदीप सैनी यांना संघात कायम ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन सामन्यांत पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विजय नोंदविणारा भारतीय संघ पाचव्या व अखेरच्या टी-२० सामन्यात आज, रविवारी यजमान न्यूझीलंडला ५-० ने क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडने तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्याच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेत कधीच सर्व सामने गमावलेले नाही.
२००५ मध्ये त्यांना मायदेशात द्विपक्षीय टी-२० मालिकेत केवळ एकदा सर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. फेब्रुवारी २००८ मध्ये इंग्लंडने त्यांना २-० ने पराभूत केले होते. या मालिकेत ५-० ने विजय मिळविला, तर भारतीय संघ टी-२० मानांकनामध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर पाचव्या स्थानावर येईल.
न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलरचा शतकी सामना ठरला. आतापर्यंत न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूला ही गोष्ट करता आलेली नाही.