Rohit Sharma And Mohammed Shami Injuries Fitness Updates After Ind vs Pak : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला शह दिल्यावर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचाही धुव्वा उडवला. 'अ' गटातील सलग दोन विजयासह भारतीय संघानं सेमीचा मार्ग सहज सोपा केला आहे. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडच्या संघाला भिडणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीसह फायनलच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण लढत असेल. या सामन्यात मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा खेळणार का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शमीसह रोहितच्या फिटनेसचा मुद्दा चर्चेत
पाकिस्तान विरुद्धच्या साामन्याात भारतीय कर्णधार रोहित शर्मासह मोहम्मद शमीच्या दुखापतीनं त्रस्त दिसले. पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज लढतीत दोघांनी काहीकाळ मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी लढतीआधी शर्मा आणि शमी यांच्या फिटनेसचा मुद्दा चर्चेत आला आहे.
श्रेयस अय्यरनं दिले यासंदर्भातील अपडेट
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना शमी स्नायू दुखापतीमुळे त्रस्त दिसला. रोहित शर्मानंही हॅमस्ट्रिंगचा सामना करताना पाहायला मिळाले. या दोघांच्या फिटनेससंदर्भात भारतीय मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरनं महत्त्वपूर्ण अपडेट दिलीये. दोघांच्या फिटनेसची चिंता करण्याची गरज नाही. त्यांना कोणताही त्रास नाही. माझं दोघांशीही बोलणं झालं आहे. त्यांना काही समस्या आहे, असे वाटत नाही, असे अय्यरनं म्हटले आहे. याचा अर्थ न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी ते उपलब्ध असतील, असे संकेतच अय्यरने दिले आहेत.
कधी रंगणार भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढत?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी फेरीतील अखेरची लढत २ मार्चला नियोजित आहे. दुबईच्या आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. न्यूझीलंडच्या संघानं सलामीच्या लढतीत पाकिस्तानला शह दिला होता. भारतीय संघाविरुद्धच्या लढतीआधी रावळपिंडीच्या मैदानात ते बांगलादेश विरुद्ध आपला दुसरा सामना खेळण्यासाठी उतरले आहेत. हा सामना जिंकण्याचं सोप टास्क त्यांच्यासमोर आहे. जर त्यांनी हा सामना जिंकला तर भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढत ग्रुपमधील टॉपर कोण या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण होईल.