Join us  

Rohit Sharma च्या कॅप्टन्सीत टीम इंडियावर नामुष्की! तरी तो किंग कोहली अन् धोनीपेक्षा भारी

इथं आपण आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात रोहित कोणत्या बाबतीत धोनी आणि विराट यांच्यापेक्षा भारी ठरतो त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 1:11 PM

Open in App

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघावर नामुष्की ओढावली. १२ वर्षांत पहिल्यांदाच टीम इंडियावर घरच्या मैदानावर मालिका गमावण्याची वेळ आली. विराट कोहली आणि धोनीच्या कॅप्टन्सीतही असं कधी घडलं नव्हतं. त्यात रोहित शर्माच्या भात्यातून धावाही होताना दिसत नाहीत. त्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीवर आणि फलंदाजीतील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. 

कॅप्टन्सीत नामुष्की ओढावली, तरी धोनी-कोहलीपेक्षा भारी ठरतो रोहित 

पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, रोहित शर्माच्या कॅप्टन्सीत भारतीय संघावर कसोटी मालिका गमावल्यामुळे नामुष्की ओढावली असली तरी तो एका बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यापेक्षा भारी ठरतो. इथं आपण आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात रोहित कोणत्या बाबतीत धोनी आणि विराट यांच्यापेक्षा भारी ठरतो त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

रोहित धावांसाठी संघर्ष करतोय खरंय, पण.. 

रोहित शर्मा सध्या मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरतोय ही गोष्ट खरीये, पण हे फक्त कॅलेंडर ईयरमधील दुसऱ्या टप्प्यात त्याच्याबाबत हे घडतंय. याआधीच्या टप्प्यात त्याने हिट शो दाखवून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या भात्यातून २ शतके पाहायला मिळाली होती. त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व करताना कसोटी सर्वोत्तम सरासरीनं धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीपेक्षा भारी ठरतो. 

 कॅलेंडर ईयरमध्ये ३० पेक्षा कमी सरासरीनं धावा करणारे भारतीय कर्णधार

कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना एका कॅलेंडर ईयरमध्ये  ७ किंवा त्यापेक्षा वरच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कमीत कमी १५ डावातील आकडेवारीनुसार, सर्वाधिक कमी सरासरीनं धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनीचा नंबर लागतो. २०११ मध्ये त्याने २१.२३ च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. या यादीत सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर आहे. २००१ मध्ये भारतीय संगाचे नेतृत्व करताना गांगुलीनं  २२.२० च्या सरासरीनं धावा काढल्या होत्या. ​मन्सूर अली खान पतौडी यांनी १९६९ मध्ये टीम इंडियाची कॅप्टन्सी करताना २३.२६ च्या सरासरीनं धावाकेल्याचा रेकॉर्ड आहे. टीम इंडियाची कॅप्टन्सी करताना कॅलेंडर ईयरमध्ये ३० पेक्षा कमी सरासरीनं धावा करणाऱ्या  फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीचाही समावेश होतो. २०२१ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना कसोटीत त्याच्या धावांची सरासरी २८.२१ अशी होती. 

रोहित शर्माला सरासरी सुधारण्याची अजूनही आहे संधी

रोहित शर्मा या सर्वांपेक्षा भारी ठरतो.  २०२४ या वर्षात त्याने ३१.०५ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. २०२२ पासून तो टीम इंडियाची कॅप्टन्सी करताना पाहायला मिळत आहे. २०२२ आणि २०२३ च्या तुलनेत त्याची सरासरी खालावली आहे. यंदाच्या वर्षातील आगामी कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करुन यात सरासरीत सुधारणा करण्याची संधी त्याच्याकडे असेल. याशिवाय खराब फॉर्म त्याला महागातही पडू शकते.  

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनी