Join us  

नेटमध्ये एन्ट्री मारताच सिक्सरची डिमांड; गप्प बसेल तो रोहित कसला! हिटमॅनची कमेंट चर्चेत

रोहित शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेशनचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 6:14 PM

Open in App

एका बाजूला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्यग्र आहे. दुसरीकडे रोहित शर्मान्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कसून सराव करताना दिसतोय. रोहित शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेशनचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. जो सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.    पहिल्या बॉलवर सिक्सर मारण्याची डिमांड,  रोहितनं आपल्या स्टाईलमध्ये दिला रिप्लाय

रोहित शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात नेट प्रॅक्टिसमध्ये जाण्यापूर्वी तो प्रॉपर तयार होताना पाहायला मिळते. रोहित ड्रेसिंग रुममधून नेटमध्ये येतो. त्यावेळी त्याला कुणी तरी पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची डिमांड करताना ऐकायला येते. यावर रोहितनंही आपल्या अंदाजात रिप्लाय दिला. 'पागल है क्या' (वेडा आहेस का?) अशा शब्दांत त्याने आल्या आल्या मोठा फटका खेळणार नाही, असे म्हणताना दिसून येते. 

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसली नाही धमक

रोहित शर्मा हा बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नव्हती. तीन सामन्यात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. परिणामी बांगलादेश विरुद्धचा त्याचा रेकॉर्ड आणखी खराब झाला आहे. पण आता न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तो गत मालिकेतील उणीवर भरुन काढण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याचा सराव पाहता ३ सामन्यांच्या मालिकेत मोठा धमाका करण्यासाठी तो प्रयत्नशील आहे, असेच दिसते. 

न्यूझीलंड विरुद्ध विजयी सिलसिला कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल टीम इंडिया, कधी अन् कुठे रंगणार सामने?

न्यूझीलंड विरुद्धची मालिका भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिनेही महत्त्वपूर्ण आहे. भारतीय संघ WTC फायनलच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. पण न्यूझीलंड विरुद्धची मालिका जिंकत आपलं स्थान आणखी भक्कम करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.१६ ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुसरा सामना महाराष्ट्रातील पुण्याच्या मैदानात रंगणार आहे. हा सामना २४ ऑक्टोबरला नियोजित आहे. १ ऑक्टोबरला दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानात शेवटचा सामना खेळण्यासाठी उतरतील.  

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड