IND vs NZ Series Full Schedule : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दिशेने मोठी झेप घेतली. भारताने श्रीलंकेविरुद्धची वन डे मालिका ३-० अशी जिंकली आणि आता त्यांचे लक्ष्य जागतिक क्रमवारीत नंबर वन बनण्याचे आहे. भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) यांच्यातली वन डे सामन्यांची मालिका बुधवारपासून सुरू होत आहे. या मालिकेत विजय मिळवून भारतीय संघाला वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. न्यूझीलंडने नुकतीच पाकिस्तान दौऱ्यावर वन डे मालिका जिंकली आहे आणि तेथून ते भारतात दाखल झाले आहेत.
आता रोहित शर्मावर टीका व्हायला हवी! विराट फॉर्मात आला तसा गौतम गंभीरने मोर्चा कॅप्टनकडे वळवला
India Squad NewZealand Series : आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) ट्वेंटी-२० संघात अखेर संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांना पुन्हा एकदा ट्वेंटी-२० संघातून बाहेर ठेवले गेले आहे. हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, तर सुर्याकडे उप कर्णधारपद कायम ठेवले गेले आहे.
- भारतीय संघ सध्या वन डे क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे पुढे आहेत
- भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची वन डे मालिका ३-० अशी जिंकल्याने त्यांचे रेटिंग गुण ११० असे झाले आहेत
- भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही ३-० अशी जिंकली तर तर ११४ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतील
- न्यूझीलंडचा संघ मात्र नकारात्कम गुणांमुळे चौथ्या क्रमांकावर जाईल, इंग्लंड दुसऱ्या व ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर कायम राहतील.
भारताचा वन डे संघ ( वि. न्यूझीलंड) - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक.
भारताचा ट्वेंटी-२० संघ ( वि. न्यूझीलंड) - हार्दिक पांड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
न्यूझीलंडचा ट्वेंटी-२० संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, ईश सोढी
न्यूझीलंडचा वन डे संघ : फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (कर्णधार भारताविरुद्ध), अॅडम मिल्ने, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, ईश सोढी
भारत-न्यूझीलंड पहिली वन डे - १८ जानेवारी, हैदराबाद दुसरी वन डे - २१ जानेवारी, रायपूरतिसरी वन डे - २४ जानेवारी, इंदूर
पहिली ट्वेंटी-२० - २७ जानेवारी, रांचीदुसरी ट्वेंटी-२० - २९ जानेवारी, लखनौतिसरी ट्वेंटी-२० - १ फेब्रुवारी, अहमदाबाद
सामन्याची वेळ : वन डे सामना दुपारी १.३० वाजल्यापासून, तर ट्वेंटी-२० सामना सायंकाळी ७ वाजल्यापासूनथेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स वाहिनी व डिस्नी हॉट स्टार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"