IND vs NZ : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन अपराजित संघ भारत व न्यूझीलंड उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत... दोन्ही संघांनी सलग ४ सामने जिंकले आहेत आणि उद्या यापैकी एका संघाची विजयी घोडदौड रोखली जाणार आहे. दोन्ही संघांना दुखापतीचे ग्रहण लागले आहे, तरीही त्यांची कामगिरी ही उजवी ठरली आहे. हार्दिक पांड्याच्या जागी कोण, हा प्रश्नाच्या उत्तरात इशान किशन व सूर्यकुमार यादव ही नावं आहेत. पण, आज सराव सत्रात सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) दुखापत झालीय आणि तो बरा न झाल्यास इशानचा पर्याय आहे. पण, इशानलाही मधमाशीने चावले आहे आणि तोही सराव अर्धवट सोडून हॉटेलमध्ये परतला.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाने नेट्समध्ये आज घाम गाळला. आऱ अश्विन, शार्दूल ठाकूर, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीचा सराव केला. पण, विराट व सूर्यकुमार यांना दुखापत झाली आणि त्यांनी सराव अर्ध्यावर सोडला. सूर्यकुमारलाही उजव्या मनगटावर चेंडू आदळल्याने दुखापत झाली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्याजवळ पळत आले. त्याने मनगटावर पट्टी बांधली. आईस पॅकने त्याने शेक घेतला आणि फिजिओ त्याच्या मनगटावर उपचार करताना दिसले. आता हाती आलेल्या वृत्तानुसार सूर्यकुमारची दुखापत गंभीर नाही आणि X Ray करण्याचीही गरज नाही.
सूर्यकुमार उद्यासाठी फिट न झाल्यास भारताकडे १३ खेळाडूच उरतील आणि त्यापैकी ११ खेळाडू निवडावे लागलीत. हार्दिक उपचारासाठी NCA मध्ये आहे. शुबमन, रोहित, विराट, श्रेयस व लोकेश हे पाच फलंदाज आघाडीवर कायम राहतील. इशानला सहाव्या क्रमांकावर खेळावे लागेल. शार्दूलच्या जागी मोहम्मद शमीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे कारण धर्मशालाची खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदत करणारी आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या ( सध्या NCAमध्ये), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव ( दुखापतग्रस्त), इशान किशन ( मधमाशी चावली), मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह