IND vs NZ : काल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अखेरचा T-20 सामना झाला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) कधी ‘सुपरमॅन’सारखा हवेत झेप घेताना दिसला तर कधी लहान मुलांसारखा पेपर विमान उडवताना दिसला. सामन्यात सूर्याने स्लिपवर दोन जबरदस्त झेल पकडले, तर नंतर बॉंड्रीवर पेपर प्लेन उडवले.
सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्या बॉंड्रीवर मजेशीर अंदाजात दिसत आहे. सूर्या फील्डिंग करत असताना प्रेक्षकांमधून कुणीतरी मैदानात पेपर विमान फेकले. हे विमान सूर्यकुमारच्या अगदी जवळ येऊन पडले. यानंतर सूर्याने ते विमान उचलले आणि परत प्रेक्षकांमध्ये फेकले.
पाचा सूर्याची जबरदस्त कॅच...
भारताचा न्यूझीलंडवर मोठा विजयभारताने तिसऱ्या T-20 मध्ये 168 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. दुसरीकडे न्यूझीलंडची ही आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारताने सलग चौथी टी-20 सीरीज आपल्या नावे केली आहे. या सामन्यात शुभमन गिलने धमाकेदार शतक झळकावले.