IND vs NZ T20 Live: अर्शदिप सिंग- मोहम्मद सिराजसमोर किवी गडगडले; 19 धावांत 6 फलंदाज माघारी परतले

IND vs NZ T20 Live Scor: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 02:31 PM2022-11-22T14:31:13+5:302022-11-22T14:31:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ T20 Live Arshdeep Singh and Mohammad Siraj took 4 wickets each for India as New Zealand set India a target of 161 | IND vs NZ T20 Live: अर्शदिप सिंग- मोहम्मद सिराजसमोर किवी गडगडले; 19 धावांत 6 फलंदाज माघारी परतले

IND vs NZ T20 Live: अर्शदिप सिंग- मोहम्मद सिराजसमोर किवी गडगडले; 19 धावांत 6 फलंदाज माघारी परतले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नेपियर : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना आज नेपियर येथे खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. मात्र भारतीय गोलंदाजांचा वचपा काढून किवी संघाने शानदार पुनरागम केले आहे. न्यूझीलंडच्या संघाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. तर भारतासमोर मालिका खिशात घालण्यासाठी 161 धावांचे आव्हान असणार आहे. 

तत्पुर्वी, यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने शानदार सुरूनवात करून देखील किवी संघ गडगडला. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना घाम फोडला. न्यूझीलंडने 19.4 षटकांत सर्वबाद 160 धावा उभारल्या आहेत. भारतीय संघाला मालिका खिशात घालण्यासाठी 161 धावांचे आव्हान असणार आहे. 

भारतीय गोलंदाजांचा बोलबाला
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शानदार सुरूवात केली होती. मात्र अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांच्या आक्रमक माऱ्यासमोर किवी फलंदाज गारद झाले. न्यूझीलंडकडून डेव्होन कॉन्वे (59) आणि ग्लेन फिलिप्स 33 चेंडूत 54 धावांची खेळी करून बाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 4-4 बळी पटकावले. तर हर्षल पटेलला 1 बळी घेण्यात यश आले. खरं तर किवी संघ 20 षटके देखील खेळू शकला नाही आणि अखेर 19.4 षटकांत सर्वबाद झाला. 

 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs NZ T20 Live Arshdeep Singh and Mohammad Siraj took 4 wickets each for India as New Zealand set India a target of 161

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.