Join us  

टाटा, बाय बाय! रोहित शर्मा, विराट कोहली यांची ट्वेंटी-२० कारकीर्द संपुष्टात? BCCI कडून मिळतायेत स्पष्ट संकेत

India Squad NZ T20 Series : सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये प्रयोग करूनही हाती काहीच न लागल्याने BCCI ने युवा खेळाडूंवर आता जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 3:18 PM

Open in App

India Squad NZ T20 Series : सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये प्रयोग करूनही हाती काहीच न लागल्याने BCCI ने युवा खेळाडूंवर आता जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त अरब अमितारी येथे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत साखळीतच गार झाला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा प्रयोग उपांत्य फेरीपर्यंत पोहोचून फसला. त्यामुळे आता बीसीसीआयने २०२४चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya) नेतृत्वाची जबाबदारी सोपवून झाली आहे. 

भारतात २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यासाठी संघातील वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, शिखर धवन आदींना तयार राहण्यास सांगितले आहे. पण, त्याचवेळी त्यांना ट्वेंटी-२० संघापासून दूर ठेवले जाईल असेही संकेत दिले गेले आहेत. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्घच्या ट्वेंटी-२० मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. त्यात आता पुढील न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० संघातही रोहित व विराट यांची निवड होणार नसल्याचे संकेत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिले आहेत. यामुळेच आता रोहित व विराट यांची ट्वेंटी-२० कारकीर्द संपुष्टात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

भारतीय संघ पुढे न्यूझीलंडविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या भारतीय संघात रोहित व विराट यांची निवड केली जाणार नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्ट्सला सांगितले. या दोघांशिवाय भुवनेश्वर कुमार, आर अश्विन व मोहम्मद शमी यांचाही ट्वेंटी-२० संघासाठी विचार केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. ''दुर्दैवाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्यांची निवड केली जाणार नाही किंवा विचार केला जाणार नाही. त्यांना वगळले गेले किंवा हकालपट्टी होणार असं काही नाही. आम्ही फक्त भविष्याचा विचार करून पाऊलं टाकत आहोत. अंतिम निर्णय हा निवड समितीचा असेल,''असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

India vs Sri Lanka ट्वेंटी-२० मालिकेनंतर होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध तीन वन डे व न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत रोहित व विराट खेळतील. पण, २७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत ते नसतील. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका पहिला सामना १८ जानेवारी हैदराबाद दुसरा सामना २१ जानेवारी रायपूर तिसरा सामना २४ जानेवारी इंदूर  टी-२० मालिका पहिला सामना २७ जानेवारी रांचीदुसरा सामना २९ जानेवारी लखनौ तिसरा सामना १ फेब्रुवारी अहमदाबाद

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माविराट कोहलीबीसीसीआय
Open in App