IND vs NZ, T20 series : भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार

India vs New Zealand, T20 series : भारतीय संघाने वन डे मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा दणदणीत विजय मिळवला आणि आंतरराष्ट्रीय वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:53 AM2023-01-25T11:53:35+5:302023-01-25T11:53:58+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, T20 series : Ruturaj Gaikwad RULED OUT of T20 series, reports to NCA with wrist injury | IND vs NZ, T20 series : भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार

IND vs NZ, T20 series : भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, T20 series : भारतीय संघाने वन डे मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा दणदणीत विजय मिळवला आणि आंतरराष्ट्रीय वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. भारताने सलग दुसऱ्या वन डे मालिकेत निर्भेळ यश मिळवलले आणि वन डे क्रमवारीत इंग्लंडला मागे टाकले. आता हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. पण, त्याआधी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याने ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या मनगटाला दुखापत झाली आहे आणि तो संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. बीसीसीआयने त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल होण्यास सांगितले आहे.

रोहित शर्माने एकाही भारतीय कर्णधाराला न जमलेली कामगिरी केली; एका दगडात मारले दोन पक्षी


ट्वेंटी-२० मालिकेसाठी तो रांची येथे दाखल होणे अपेक्षित होते, परंतु त्याने मनगट दुखत असल्याचे बीसीसीआयला कळवले. बीसीसीआय त्याच्या जागी बदली खेळाडूचे नाव जाहीर करण्याची शक्यता कमी आहे. भारताने ट्वेंटी-२० मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात ओपनिंगसाठी तीन पर्यात आहेत. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. ऋतुराजला मागच्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेलाही मुकावे लागले होते. यावेळी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.

''ऋतुराज मनगटाच्या दुखापतीमुळे NCAत दाखल झाला आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याची कल्पना नाही, परंतु ट्वेंटी-२० मालिकेसाठी तो बरा होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या दुखापतीचं स्कॅन करावं लागणार आहे. सध्या संघात ४-५ सलामीवीर आहेत, परंतु ऋतुराजच्या जागी बदली खेळाडूची निवड करायची की नाही हे निवड समिती ठरवेल,''असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने InsideSport ला सांगितले. ऋतुराज गायकवाडसह या मालिकेत श्रेयस अय्यरसंजू सॅमसन हेही दुखापतीमुळे खेळणार नाहीत. अय्यर पाठीच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी सध्या NCA मध्ये आहे. तर संजू सॅमसन गुडघ्याच्या दुखापतीवर कोची येथे फिजिओथेरेपी घेतोय.   

ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार ( India’s T20I squad against New Zealand: Hardik Pandya (Captain), Suryakumar Yadav (vice-captain), Ishan Kishan (wk), Shubman Gill, Deepak Hooda, Rahul Tripathi, Jitesh Sharma (wk), Washington Sundar, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Arshdeep Singh, Umran Malik, Shivam Mavi, Prithvi Shaw, Mukesh Kumar.)

IND vs NZ T20 Schedule:
पहिली ट्वेंटी-२० - २७ जानेवारी, रांची
दुसरी ट्वेंटी-२० - २९ जानेवारी, लखनौ
तिसरी ट्वेंटी-२० - १ फेब्रुवारी, अहमदाबाद 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, T20 series : Ruturaj Gaikwad RULED OUT of T20 series, reports to NCA with wrist injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.