भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सुरु आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडच्या संघाने या सामन्यात ३०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवलीये. तिसऱ्या दिवसाच्या खेळात न्यूझीलंडचा संघ भारतासमोर ४०० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. दुसरीकडे भारतीय संघ लवकरात लवकर न्यूझीलंडचा दुसरा डाव आटोपण्यासाठी प्रयत्नशील असेल.
४०० पारची लढाईही जिंकलीये, पण...
पुणे कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघ भारतीय संघासमोर ४०० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करण्यात यशस्वी ठरला तर भारतीय संघासमोर हे मोठे चॅलेंज असेल. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघाने कधीच ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. ओवर ऑल रेकॉर्डचा विचार केला तर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध भारतीय संघाने ४०० पारची लढाईही जिंकून दाखवली होती. इथं एक नजर टाकुयात घरच्या मैदानात ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं रचला होता इतिहास
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत पाच वेळा टीम इंडियावर ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्याची वेळ आली आहे. यात एकदा टीम इंडियाने विजयही मिळवलाआहे. २००८ मध्ये टीम इंडियाने ३०० + धावांचा यशस्वी पाठलाग करत इंग्लंड विरुद्ध एकमेव सामना जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघआने ३८७ धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला होता. या सामन्यात सेहवागनं स्फोटक अंदाजात अर्धशतक झळकावले होते तर सचिन तेंडुलकरच्या भात्यातून सेंच्युरी आली होती.
घरच्या मैदानात ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना भारताचा रेकॉर्ड
- १९४८ विरुद्ध वेस्टइंडिज- अनिर्णित (ड्रॉ)
- १९४९ विरुद्ध वेस्टइंडिज - अनिर्णित (ड्रॉ)
- १९७९ विरुद्ध पाकिस्तान - अनिर्णित (ड्रॉ)
- १९८६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया - सामना बरोबरीत सुटला
- २००८ विरुद्ध इंग्लंड - विजय
कसोटीत धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा ओवरऑल रेकॉर्ड
- ४०३ विरुद्ध वेस्ट इंडीज १९७६ पोर्ट ऑफ स्पेन
- ३८७ विरुद्ध इंग्लंड२००८ चेन्नई
- ३२८ विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०२१ ब्रिस्बेन
- २७६ विरुद्ध वेस्ट इंडिज २०११ दिल्ली
Web Title: IND vs NZ Team India Chased A Target Of More Than 300 Runs Only Once At Home See Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.