भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा तगडा 'प्लॅन'; धोनी-रोहितचा 'दोस्त' बनला किवींचा गोलंदाजी कोच

India vs New Zealand Test: हा खेळाडू धोनी, रोहितसोबत IPL खेळला असल्याने त्याला भारतीय खेळपट्ट्यांचा चांगला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:59 PM2024-08-29T12:59:07+5:302024-08-29T13:01:02+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ Test New Zealand cricket appoints legendary all-rounder Jacob Oram as bowling coach ahead of India series | भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा तगडा 'प्लॅन'; धोनी-रोहितचा 'दोस्त' बनला किवींचा गोलंदाजी कोच

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा तगडा 'प्लॅन'; धोनी-रोहितचा 'दोस्त' बनला किवींचा गोलंदाजी कोच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand Test: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी किवी संघाने आतापासूनच जोरदार तयारी करण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून न्यूझीलंडने एका खास माजी खेळाडूला संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ७ ऑक्टोबरपासून तो पदभार स्वीकारणार आहे. न्यूझीलंडचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. याच दरम्यान शेन जर्गेनसेनच्या जागी न्यूझीलंडचा माजी स्टार खेळाडू जेकब ओरम (Jacob Oram) हा न्यूझीलंड नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहील. जेकब ओरम हा धोनी आणि रोहित शर्मासोबत आयपीएल खेळला आहे. अशा परिस्थितीत त्याला भारतीय खेळपट्ट्यांचा चांगला अनुभव असल्याने ही न्यूझीलंडसाठी जमेची बाब असेल असे मानले जात आहे.

न्यूझीलंड संघाचा दौरा

जेकब ओरमने पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात न्यूझीलंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथे खेळवली जाणार आहे. दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे. तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवली जाणार आहे.

जेकब ओरमला कोचिंगचा अनुभव

गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जेकब ओरम गेल्या वर्षी बांगलादेश दौऱ्यावर न्यूझीलंड संघासोबत गेला होता. या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या घरच्या टी२० मालिका आणि २०२४ च्या टी२० विश्वचषकातही त्याने संघाची मदत केली होती. पण आता त्याचा पूर्णवेळ कोच म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Web Title: IND vs NZ Test New Zealand cricket appoints legendary all-rounder Jacob Oram as bowling coach ahead of India series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.