Join us  

IND vs NZ Test series: महाराष्ट्र सरकारचा हिरवा सिग्नल; वानखेडे स्टेडियमवर १०० टक्के प्रेक्षकक्षमतेला दिली परवानगी

India vs New Zealand Test series: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता टीम इंडिया १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. त्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 5:38 PM

Open in App

India vs New Zealand Test series: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता टीम इंडिया १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे आणि या लढतीसाठी प्रेक्षकांना परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारनं या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला १०० टक्के प्रेक्षकक्षमतेला परवानगी दिली  आहे. ३ डिसेंबरपासून दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भारतीय खेळाडूंसाठी कॅम्प भरवण्यात येणार आहे. 

''दुसऱ्या कसोटीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला १०० टक्के प्रेक्षकक्षमतेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. तसेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये कॅम्प होतील,''असे सूत्रांनी सांगितले. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, वृद्धीमान सहा आणि उमेश यादव यांचा कॅम्पमध्ये सहभाग असेल.  

भारताचा कसोटी संघ  - अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), के. एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. ( विराट कोहली दुसऱ्या कसोटीसाठी ताफ्यात दाखल होणार)

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडबीसीसीआयमुंबई
Open in App