India vs New Zealand, Test Series : भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-२० मालिका संपवून दोन्ही संघातील कसोटी खेळणारे खेळाडू कोलकाताहून सोमवारी कानपूरला पोहोचले. पण, कानपूर येथे पोहोचल्यानंतर भारत-न्यूझीलंड यांच्या ताफ्यात अचानक बाहेरील गाडी शिरल्यानं एकच घबराट पसरली. विमानतळ ते हॉटेल या प्रवासादरम्यान दोन्ही संघांच्या ताफ्यात ही बाहेरील गाडी शिरल्यानं सुरक्षारक्षकही गोंधळून गेले.
दैनिक भास्करनं दिलेल्या माहितीनुसार कानपूर येथे पोहोचल्यानंतर जेव्हा भारत आणि न्यूझीलंडचा संघ विमानतळावरून हॉटेलसाठी रवाना होत होतो, तेव्हा एक काळ्या रंगाची XUV संघाच्या ताफ्यात शिरली. अचानक ही गाडी ताफ्यात शिरल्यानं सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली आणि एकच घबराट उडाली. पण, जेव्हा चौकशी करण्यात आली, तेव्हा ती कारही हॉटेललाच जात होती आणि त्यात बीसीसीआयचे काही अधिकारी असल्याचे समोर आले.
पहिल्या कसोटीसाठी भारताच्या पाच खेळाडूंसह न्यूझीलंडचा संपूर्ण संघ स्पाइसजेटनं सोमवारी दुपारी २.२५ वाजता कानपूरला पोहोचले. चकेरी विमानतळावर उतरल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू सपोर्ट स्टाफ व प्रशिक्षकांसह बायो बबलमधून हॉटेलसाठी रवाना झाले. दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी वेगवेगळ्या बसची सोय करण्यात आली होती. कानपूरमध्ये दाखल होणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये लोकेश राहुल, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, आर अश्विन व मोहम्मद सिराज यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी व गोलंदाजी प्रशिक्षकही होते.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा ( India’s first Test Squad: Ajinkya Rahane (c), Cheteshwar Pujara (vc), KL Rahul, Mayank Agarwal, Shubman Gill, Shreyas Iyer, Wriddiman Saha (wk), KS Bharat (wk), Ravindra Jadeja, R Ashwin, Axar Patel, Jayant Yadav, Ishant Sharma, Umesh Yadav, Mohammed Siraj, Prasidh Krishna)
न्यूझीलंडचा कसोटी संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, ग्लेन फिलिप्स, राचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविल, टीम साऊदी, रॉस टेलर, विल यंग, निल वॅगनर ( New Zealand’s Test Squad: Kane Williamson (c), Tom Blundell (wk), Kyle Jamieson, Tom Latham, Henry Nicholls, Ajaz Patel, Glenn Phillips, Rachin Ravindra, Mitchell Santner, Will Somerville, Tim Southee, Ross Taylor, Will Young, Neil Wagner)
Web Title: IND vs NZ, Test Series : Sensation due to outside vehicle entering the convoy of India-New Zealand teams in Kanpur, security personnel lost their senses, know the whole incident
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.