Join us  

Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 

एका मोठ्या खेळीसह विराट कोहली एका डावात हे सर्व विक्रम मोडित काढू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 6:52 PM

Open in App

 IND vs NZ 5 Big Milestones Virat Kohli Can Achieve In The 2nd Test Pune: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी २४ ऑक्टोबरपासून पुण्याच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात विराट कोहलीनं ७० धावांची दमदार खेळी केली होती. पण्यात तो यापेक्षा मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा पल्ला गाठल्यावर आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही विराट कोहलीला अनेक विक्रम खुणावत आहे. एक नजर टाकुयात पुण्याच्या मैदानात कोहलीच्या निशाण्यावर असतील अशा ५ विक्रमांवर  

डेविड वॉर्नरला मागे टाकण्याची संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली सध्या डेविड वॉर्नरच्या मागे आहे. पण पुण्याच्या मैदानात २० धावा करताच तो डेविड वॉर्नरच्या पुढे निघून जाईल. वॉर्नरनं आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत २४२३ धावा केल्या आहेत. कोहलीच्या खात्यात २४०४ धावा जमा आहेत.    

डॉन ब्रॅडमन यांचा मोठा विक्रमही किंग कोहलीच्या टप्प्यात 

डॉन ब्रॅडमन यांनी कसोटीत २९ शतके झळकावली आहेत. कोहलीनंही तेवढीच शतकं झळकावली आहेत. पुण्याच्या मैदानात त्याच्या भात्यातून शतक आले तर डॉन ब्रॅडमन यांच्या तो पुढे  निघून जाईल. जयसूर्याचा सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम   

विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३१ अर्धशतके झळकावली आहेत. एका अर्धशतकासह तो  श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या, ग्रेग चॅपल, रामनरेश सारवन, तमीम इक्बाल आणि ब्रँडन मॅक्ल्युलम या दिग्गजांना मागे टाकेल. या सर्वांच्या खात्यात प्रत्येकी ३१-३१ अर्धशतकांची नोंद आहे. 

ग्राहम डाउलिंग या दिग्गज क्रिकेटरचा रेकॉर्डही नजरेत 

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीत कोहलीच्या खात्यात ९३६ धावा जमा आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील ग्राहम डाउलिंग (९६४) यांना  मागे टाकण्याची संधीही किंग कोहलीकडे आहे. यासाठी त्याला फक्त २९ धावा करायच्या  आहेत. या दोन संघातील कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम हा द्रविडच्या नावे आहे. त्याने १५ सामन्यात १६५९ धावा केल्या आहेत. 

आशियाई मैदानात १६ हजार धावांचा टप्पा पार करण्याच्या अगदी जवळ आहे कोहली

पुणे कसोटी सामन्यात ५५ धावा करताच आशियाई मैदानात १६ हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा टप्पा तो पार करेल. सध्याच्या घडीला या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. 

आशियात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे फलंदाज (Most international runs in Asia)

  • २१७४१ - सचिन तेंडुलकर 
  • १८४२३ - कुमार संगकारा
  • १७३८६ - महेला जयवर्धने 
  • १५९४५ - विराट कोहली* 
  • १३७५७ -सनथ जयसूर्या 
  • १३४९७ - राहुल द्रविड
टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघपुणेन्यूझीलंड