Join us  

Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार

आर अश्विन आला अन् रोहित शर्मासह टीम इंडियाचा ताफा टेन्शन फ्री झाला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 5:25 PM

Open in App

IND vs NZ Ravichandran Ashwin Cleaned up Devon Conway 91 Runs Watch Video : बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात न्यूझीलंडच्या ताफ्यातील गोलंदाजांनी भारतीय संघातील तगड्या बॅटिंग लाइनला सुरुंग लावला. भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. त्यानंतर कर्णधार टॉम लॅथम आणि डेवॉन कॉन्वे या न्यूझीलंडच्या सलामी जोडीनं भारतीय गोलंदाजांना दमवलं. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ६७ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवनं टॉम लॅथमच्या १५(४९) रुपात टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले. त्यानंतर जड्डूनं विल यंग ३३(७३) याला तंबूचा रस्ता दाखवत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. पण दुसऱ्या बाजूला डेवॉन कॉन्वे अगदी तोऱ्यात खेळताना दिसला. 

आर. अश्विननं कॉन्वेचा खेळ केला खल्लास!

डेवॉन कॉन्वे यानं अर्धशतक पूर्ण केल्यावर शतकाच्या दिशेनं वाटचाल करत टीम इंडियाच्या ताफ्यातील टेन्शन वाढवलं होते. पण आर अश्विन आला अन् रोहित शर्मासह टीम इंडियाचा ताफा टेन्शन फ्री झाला.  न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ४० व्या षटकात आर अश्विन याने डेवॉन कॉन्वेला ९१ धावांवर बाद केले. रिव्हर्स स्वीप मारण्याचा कॉन्वेचा प्रयत्न फसला अन् तो क्लीन बोल्ड झाला. भारतीय संघाला मिळालेले हे मोठे यश होते. त्यामुळे संघातील खेळाडूंचा मैदानातील माहोल बघण्याजोगा होता. 

रोहित-विराटनं खास अंदाजात केलं कॉन्वेच्या विकेटच सेलिब्रेशन

कर्णधार रोहित शर्मानं आपल्या खास अंदाजात स्माइल करत कॉन्वेच्या विकेटचा आनंद साजरा केला. दुसरीकडे विराट कोहलीमध्ये पुन्हा एकदा 'डान्सिंग किंग' दिसला. कोहली हा मैदानातील आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळते. आर अश्विन याने कॉन्वेची विकेट  मिळवून दिल्यावर  किंग कोहली भांगडा करत या विकेटच सेलिब्रेशन करताना दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 

दोघांसोबत अर्धशतकी भागीदीरी, पण शतक अवघ्या ९ धावांनी हुकलं

डेवॉन कॉन्वेनं कॅप्टन टॉम लॅथमसोबत अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी विल यंगच्या साथीनं त्याने ७५ धावांची भागीदारी केली. रचिन रविंद्रसोबत पुन्हा तो आणखी एक भागीदारी रचण्याच्या इराद्याने खेळत होता. पण स्वीपचा त्याचा प्रयत्न अश्विनने हाणून पाडला त्यामुळे अवघ्या १२ धावांच्या भागीदारीसह ही जोडी फुटली. त्याचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकलं.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडआर अश्विनरोहित शर्माविराट कोहली