Join us  

पंत खरंच OUT होता? थर्ड अंपायर चुकला? ड्रेसिंग रुममध्ये क्रिएट झाला 'ड्रामा'

चेंडू बॅटला स्पर्श झाला होता की, बॅट पॅडच्या संपर्कातील  स्निकोच्या आधारावर पंतला बाद ठरवण्यात आले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 1:00 PM

Open in App

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात रिषभ पंतनं अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढणारी खेळी केली. टीममधील सहकाऱ्यांसह सर्व चाहत्यांच्या नजरा त्याच्या खेळीवर खिळल्या असताना  एजाज पटेलनं त्याच्या रुपात टीम इंडियाला सातवा धक्का दिला. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील २२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडनं पंतच्या विकेटसाठी जोरदार अपील केली. मैदानातील पंचांनी नाबाद दिल्यावर न्यूझीलंडनं रिव्ह्यू  घेतला अन् थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर पंतला मैदान सोडावे लागले. पंतन ५७ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

मैदानातील पंचांनी दिलं होतं नॉट आउट; पण थर्ड अंपायरचा निर्णय आला 'आउट'

एजाज पटेलनं टाकलेल्या चेंडूवर पंतनं डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅट पॅडवर लागून टॉम ब्लंडेलच्या हाती गेल्याचा विश्वासानं न्यूझीलंडन त्याच्या विकेटची अपील केली. मैदानातील पंचानी ही अपील फेटाळून लावली. पण रिव्हूमध्ये थर्ड अंपायचा निर्णय पंत आणि टीम इंडियाच्या विरोधात आला. बॅटची कड घेऊन चेंडू पॅडवर आढळल्याचा स्निको पुराव्यासह थर्ड अंपायरनं पंत बाद असल्याचा निर्णय दिला.  

थर्ड अंपायरच्या निर्णयावर पंतला विश्वासच बसेना! 

पंत मात्र या निर्णयावर नाराज दिसला.  बॅट आणि बॉल यांचा संपर्क झालेला नाही, असे तो मैदानातील अंपायरला सांगताना दिसला. एवढेच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही तो याच मुद्यावर चर्चा करताना स्पॉट झाले. त्यामुळे चेंडू बॅटला स्पर्श झाला होता की, बॅट पॅडच्या संपर्कातील  स्निकोच्या आधारावर पंतला बाद ठरवण्यात आले असा नवा वाद या विकेट्समुळे निर्माण होताना दिसतोय. सोशल मीडियावरही याची चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.