नवी दिल्ली : सध्या न्यूझीलंडच्या धरतीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. आज होणारा अंतिम सामना निर्णायक सामना असणार आहे. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. खरं तर पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला आजचा सामना म्हणजे शेवटची संधी असणार आहे. पंत मागील काही कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याला विश्वचषकातील 2 सामने खेळण्याची संधी मिळाली होती मात्र तिथेही तो खास कामगिरी करू शकला नाही.
दरम्यान, रिषभ पंतच्या जागीसंजू सॅमसनचे भारतीय संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. कारण ऋषभ पंतने मागील 14 टी-20 सामन्यांमध्ये सरासरी आणि 24.25 आणि 132.87 च्या स्ट्राईक रेटने केवळ 194 धावा केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेचा संजू सॅमसन हिस्सा आहे, मात्र एकाही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. आजच्या निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघाची धुरा टीम साउदीच्या खांद्यावर असणार आहे.
संजू सॅमसन पंतला वरचढ यावर्षी टी-20 मध्ये चांगली खेळी करूनही अद्याप संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. सॅमसनने 2022 मध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 44 च्या सरासरीने आणि 158 च्या स्ट्राईक रेटने 179 धावा केल्या आहेत. साहजिकच आगामी काळात भारतीय संघातून रिषभ पंतचा पत्ता कट होऊ शकतो.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"