Join us  

IND vs PAK: "मला तुझा अभिमान आहे, मी तुला पाहतोय", आजच्या सामन्यासाठी डिव्हिलियर्सने दिल्या 'विराट' शुभेच्छा

आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 5:05 PM

Open in App

नवी दिल्ली : कालपासून आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. आज या बहुचर्चित स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  एका मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे आजचा सामना विराट कोहलीचा टी-२० आंतरराष्ट्रीय मधील १००वा सामना आहे. विराट मागील मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे, त्याला मागील जवळपास ३ वर्षांपासून एकही शतकी खेळी करता आली नाही. किंग कोहलीला या त्याच्या उल्लेखणीय विक्रमासाठी क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज शुभेच्छा देत आहेत. 

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा माजी खेळाडू ए.बी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध असलेला डिव्हिलियर्स किंग कोहलीचा जवळचा सहकारी आहे. विराटच्या माजी सहकाऱ्याने व्हिडीओच्या माध्यमातून विराटला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

डिव्हिलियर्सने दिल्या 'विराट' शुभेच्छाए.बी डिव्हिलियर्सने व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले, "विराट कोहलीचे खूप खूप अभिनंदन. तो भारतीय संघाचा एकमेव खेळाडू आहे जो १०० टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सामने खेळत आहे. तुझे १०० टी-२० सामने पूर्ण होतायत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा, मला तुझा अभिमान असून मी तुझे क्रिकेट पाहत आहे." 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीटी-20 क्रिकेटएबी डिव्हिलियर्स
Open in App