IND vs PAK: मोदींनी दिला पाकिस्तानला धीर! वीरूचे ट्विट पाहून झाले सारे बधीर... भारताच्या विजयानंतर याचीच हवा

टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 06:21 PM2022-10-23T18:21:44+5:302022-10-23T18:24:03+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK After India beat Pakistan by 4 wickets, Virender Sehwag has mocked Pakistan  | IND vs PAK: मोदींनी दिला पाकिस्तानला धीर! वीरूचे ट्विट पाहून झाले सारे बधीर... भारताच्या विजयानंतर याचीच हवा

IND vs PAK: मोदींनी दिला पाकिस्तानला धीर! वीरूचे ट्विट पाहून झाले सारे बधीर... भारताच्या विजयानंतर याचीच हवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला. भारताने सुरूवातीपासूनच शानदार गोलंदाजी करून पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव टाकला. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी ३-३ बळी पटकावले. एकिकडे १५० चा आकडा गाठणे कठीण वाटत असताना पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हानात्मक लक्ष ठेवले होते. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद (५१) आणि शान मसूदने ४२ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली. अखेर पाकिस्तानने २० षटकांत ८ बाद १५९ धावा केल्या. भारतीय संघाच्या विजयानंतर अनेक माजी खेळाडू पाकिस्तानला डिवचत आहेत. तर वीरेंद्र सेहवागने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो ट्विट करून पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. 

तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून शेजाऱ्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक मारा करून पाकिस्तानच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवले. भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम डावाच्या दुसऱ्याच षटकांत बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवून भारताला चांगली सुरूवात करून दिली. अखेरच्या काही षटकांमध्ये पाकिस्तानने डाव सावरला आणि २० षटकांत ८ बाद १५९ धावा करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना किंग कोहलीने ऐतिहासिक खेळी केली. 

भारतीय गोलंदाजांची सांघिक खेळी 
भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना १-१ बळी घेण्यात यश आले. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर संघाच्या अवघ्या १० धावांवर माघारी परतले होते. मात्र विराट कोहलीने सावध खेळी करून डाव सावरला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल हेही स्वस्तात परतले. संघाची धावसंख्या ३१ असताना ४ गडी बाद झाले होते. अशा स्थितीत किंग कोहलीने संघाचा डाव सावरला आणि अखेरच्या षटकापर्यंत नेला. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

किंग कोहलीची विराट खेळी 
हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, हैदर अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ, 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs PAK After India beat Pakistan by 4 wickets, Virender Sehwag has mocked Pakistan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.