पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तिच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. आयसीसी लेवल १ कोड ऑफ कंडक्टच्या नियमात फसली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 08:43 PM2024-10-07T20:43:31+5:302024-10-07T20:46:44+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK Arundhati Reddy has been reprimanded for For Breaching icc code of conduct giving a fiery send-off to Nida Dar | पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई

पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Arundhati Reddy Found Guilty Breaching Level 1 Of The ICC Code Of Conduct : युएईच्या मैदानात सुरु असलेल्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरुद्धच्या लढतीनं विजयाची सुरुवात केली. या सामन्यातील भारताच्या विजयात जलदगती गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने मोलाचा वाचा उचलला. तिने ४ षटकात १६ धावा खर्च करून ३ विकेट्स घेत टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. 

आधी प्लेयर ऑफ द मॅचसह सन्मान, आता ICC नं फटकारले
 
भारत-पाक यांच्यातील सामन्यात मॅचला कलाटणी देणारी कामगिरी केल्यानंतर तिला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. पण त्यानंतर आता आयसीसीने तिला चांगलेच फटकारले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तिच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. आयसीसी लेवल १ कोड ऑफ कंडक्टच्या नियमात फसली आहे. 

निदा दरची विकेट घेतल्यावर आक्रमक अंदाजात केलं होत सेलिब्रिशन

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्य़ात अखेरच्या षटकात अरुंधती रेड्डीनं निदा दर हिला बोल्ड केले होते. त्यानंतर अरुंधतीनं आक्रमक अंदाजात या विकेट्सच सेलिब्रेशन केले. पाक बॅटरला तिने खुन्नस दिली. हातवारे करत पाकिस्तानी बॅटरला तिने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याप्रकरणात आयसीसीने भारतीय स्टार गोलंदाजाला आयसीसी लेवल १ कोड ऑफ कंडक्ट अंतर्गत दोषी ठरवले आहे. आयसीसीने दिलेल्या निवेदनानुसार, रेड्डीनं खेळाडू आणि स्टाफ सदस्यांशी संबंधित आयसीसी आचार संहितेच्या कलम २.५ अंतर्गत दोषी आढळली आहे.  

काय झाली कारवाई?

या प्रकरणात अरुंधतीच्या  खात्यात एक डिमेरिट पॉइंट जमा झाला आहे. मागील २४ महिन्यात पहिल्यांदाच तिच्यावर ही वेळ आली आहे. त्यामुळं तुर्तास भारताला याचा फटका बसणार नाही. पुढचा सामना खेळण्यात तिला कोणताही व्यत्यय येणार नाही. २ वर्षांच्या कालावधीत ४ डिमेरिट पॉइंट खेळाडूच्या खात्यात जमा 

Web Title: IND vs PAK Arundhati Reddy has been reprimanded for For Breaching icc code of conduct giving a fiery send-off to Nida Dar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.