Join us

IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)

 विकेट मिळाल्यावर अरुधंतीनं आक्रमक अंदाजात हातवारे करत पाक बॅटरला तंबूचा रस्ता  दाखल्याचा सीन पाहायला मिळाला.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:27 IST

Open in App

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमधील आक्रमक अंदाज अनेकदा चर्चेचा विषय राहिला आहे. महिला क्रिकेटही त्याला अपवाद नाही. दुबईच्या आंतरारष्ट्रीय क्रिकेट मैदानात भारताकडून अरुंधती रेड्डीनं आपल्या गोलंदाजीची खास छाप सोडली. या सामन्यात अरुंधती रेड्डी (Arundhati Reddy) नं पाकची स्टार अन् भरवशाची बॅटर निदा दर (Nida Dar) हिला क्लीन बोल्ड केले.  विकेट मिळाल्यावर अरुधंतीनं आक्रमक अंदाजात हातवारे करत पाक बॅटरला तंबूचा रस्ता  दाखल्याचा सीन पाहायला मिळाला.  

अरुंधतीचे तेवर दिग्गज प्रसादचा त्या अविस्मरणीय सीनला उजाळा देणारे

अरुंधती रेड्डीचा हे तेवर १९९६ मध्ये भारत पाक पुरुष मॅचमध्ये व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) आणि आमिर सोहेल (Aamer Sohail) यांच्यात झालल्या शाब्दिक चकमकीच्या अविस्मरणीय सीनला उजाळा देणारे होते. भारत-पाक यांच्यातील सामन्या वेळी खेळाडू आपल्या अशा अंदाजाने खेळात एक वेगळा रंग भरताना पाहायला मिळते. तोच सीन पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

 

अरुंधतीला एवढा राग का आला?

अरुंधती रेड्डी हिने भारताकडून पाकिस्तानच्या डावातील शेवटचे षटक टाकले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अरुंधतीनं  निदा दर (Nida Dar) विरोधात पायचितचे जोरदार अपील केले. मैदानातील महिला अंपायरने तिची अपील फेटाळली. मग हरमनप्रीतनं तिच्या विकेटसाठी रिव्ह्वू घेतल्याचेही पाहायला मिळाले. DRS चा निर्णय  अंपायर कॉल असल्यामुळे निदा दरची विकेट वाचली. अरुंधतीनं पुढच्या चेंडूवर तिला क्लीन बोल्ड करत तिचा खेळ खल्लास केला. विकेट आधी जे घडलं त्यामुळे अरुंधतीनं अगदी तावातावाने तिला तंबूचा रस्ता दाखवल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानकडून निदा दर हिनेच सर्वाधिक २८ धावांची खेळी केली.

१९९६ वर्ल्ड कपमधील तो सीन आजही क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय

१९९६ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात व्यंकटेश प्रसाद आणि आमिर सोहेल यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली होती. प्रसादच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार मारल्यावर पाकच्या आमिर सोहेल याने त्याला तो बघ बॉल या धाटणीतला इशारा केला होता. मग प्रसादने त्याची विकेट घेत त्याला हातवारे करून जा आता असा इशारा केला होता. अरुंधतीचा अंदाज हा या सीनची आठवण करून देणारा होता.   

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतीय क्रिकेट संघपाकिस्तान