IND vs PAK, Asia Cup 2022: स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला दुबईच्या मैदानात सुरूवात होणार आहे. हा सामना सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जल्लोष सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानचे चाहते एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. आपलाच संघ विजेता होणार असे चाहते ठणकावून सांगत आहे. याच दरम्यान, या सामन्याआधी घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही विनोदी मीम्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पाहूया त्यापैकी काही निवडक मीम्स-
--
--
--
--
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर नेहमीच विनोदी पद्धतीने क्रिकेटमधील विविध विषयांवर भाष्य करताना दिसतो. वसीम जाफरने आजही एक दमदार व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्वीटमध्ये तो सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यापूर्वी चाहते आपापसात कसे भांडत आहेत, ते दाखवत आहे.
दरम्यान, आशिया चषकाचा हा थरार ४ वर्षानंतर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना रंगणार आहे. जगातील कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याइतकी उत्सुकता क्वचितच पाहायला मिळते. गेल्या वेळी भारत-पाकिस्तान हे संघ टी२० वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून एकतर्फी पराभव केला होता. योगायोगाने आजचा सामनादेखील युएईच्या मैदानावरच होणार आहे, जेथे भारताचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आज भारताकडे पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.