ind vs pak asia cup 2023 | नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान मोठ्या कालावधीनंतर वन डे सामन्यात आमनेसामने असणार आहेत. सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या बहुचर्चित सामन्यापूर्वी अनेक जाणकार आपापली मतं मांडत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं एक दावा केला असून नाणेफेक महत्त्वाची ठरणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
पाकिस्तानी संघ भारताविरूद्धच्या सामन्यात आपला दबदबा कायम ठेवेल असा विश्वास अख्तरनं व्यक्त केला आहे. तसेच जो संघ प्रथम फलंदाजी करेल तो सहज सामना जिंकेल, असंही त्यानं सांगितलं. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलत होता. "बाबर आझम आणि त्याचा संघ बराच परिपक्व आहे. याआधीही त्यांनी भारताविरुद्ध चांगली खेळी केली आहे. त्यामुळे ते सध्या दडपणाखाली राहणार नाहीत. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली तर हा सामना ते जिंकतील असं मी म्हणू शकतो. तसेच भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी केली तर पाकिस्तानची अडचण वाढू शकते. असं झाल्यास भारत सामना आपल्या नावावर करेल. कारण दुसऱ्यांदा फलंदाजी करताना लाईट्सचा प्रभाव असेल. पण, भारतीय संघावर माध्यमांचा खूप दबाव असल्यानं पाकिस्तानची बाजू मजबूत असेल", असा दावा अख्तरनं केला.
भारताविरूद्ध पाकिस्तानचा वरचष्मा - अख्तर अख्तरनं आणखी सांगितलं की, दोन्ही संघांना चांगली संधी आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज हे सर्व खेळणार आहेत. कुलदीप यादवही हा सामना खेळू शकतो. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार की चौथ्या क्रमांकावर खेळणार याबाबत चर्चा सुरू आहे. इशान किशन सलामीला येऊ शकतो. किंवा त्याला पाचव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. मात्र, या सामन्यात पाकिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. त्यांच्याकडे आता पूर्वीसारखी कमजोर मिडल ऑर्डर राहिलेली नाही. आता पाकिस्तानी संघ खूप चांगला झाला आहे.
दरनम्यान, भारताविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्ताननं आपला संघ जाहीर केला आहे. तर, अद्याप भारतीय संघ जाहीर झालेला नाही. त्यामुळं पाकिस्तानविरूद्धच्या बहुचर्चित सामन्यात टीम इंडियात कोणाला संधी मिळते हे पाहण्याजोगं असेल.
भारताविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन)
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल