Join us  

अद्भूत... अविश्वसनीय... चक्क जिभेने रेखाटलं विराट कोहलीचं चित्र; Video होतोय व्हायरल

फॅन्स आपल्या आवडीच्या खेळाडूसाठी काय करतील हे कुणीच सांगू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 12:04 PM

Open in App

Virat Kohli Portrait by Tongue Viral Video : विराट कोहलीची गणना भारतातीलच नव्हे तर जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. तो मैदानावर आल्यावर प्रेक्षक त्याच्या नावाचा जयघोष करताना दिसतात. त्याचं फॅन फॉलोइंग बॉलिवूड सुपरस्टारपेक्षा कमी नाही. विराटची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचतात. तशातच आता एका कलाकाराने विराटचा वेगळ्या पद्धतीचा फॅन असल्याचे दाखवून दिले आहे.

विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत श्रीलंकेत आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कप2023 चे जेतेपद पटकावण्याच्या तयारीत व्यस्त आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्याचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात विराटच्या चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या साखळी सामन्यात त्याला विशेष काही करता आले नव्हते. पण आज त्याने चांगली खेळी करावी म्हणून विराटला एका चाहत्याने विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

जिभेने रेखाटलं विराटचं चित्र

सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणार्‍या खेळाडूंपैकी एक असलेल्या विराटबद्दल एका कलाकाराने आपली आवड दाखवली आहे. या कलाकाराने आपल्या जिभेने विराट कोहलीचा फोटो बनवला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेहनत आणि समर्पणाने हा कलाकार विराट प्रति आपले प्रेम व्यक्त करतोय हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पाहा व्हिडीओ-

पाकविरुद्ध विराटकडून दमदार खेळीची अपेक्षा

दरम्यान, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याबाबत चाहत्यांना विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७६ शतके ठोकली आहेत. सर्वोच्च स्थानावर महान सचिन तेंडुलकर आहे, ज्याने शतके म्हणजे १०० आंतरराष्ट्रीय शतके नोंदवली आहेत. त्यामुळे विराटने आणखी एक शतक ठोकावे अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :एशिया कप 2023विराट कोहलीसोशल व्हायरल
Open in App