Join us  

India vs Pakistan: आशिया चषकापूर्वी माइंड गेम! पाकिस्तानी फिरकीपटूने विराट कोहलीबाबत केले मोठे विधान

भारत विरूद्ध पाकिस्तान हा बहुचर्चित सामना व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 12:02 PM

Open in App

Ind vs Pak Asia Cup । नवी दिल्ली : भारत विरूद्ध पाकिस्तान हा बहुचर्चित सामना व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानच्या संघाने माइंड गेम खेळण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानच्या संघाचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने विराट कोहलीबाबत (Virat Kohli)  एक विधान केले आहे. विराट कोहली फॉर्ममध्ये परतला नाही तर भारताच्या अडचणीत वाढ होईल असे कानेरियाने म्हटले आहे. तर भारतीय संघात एकापेक्षा एक वरचढ खेळाडूंचा समावेश आहे, जे पाकिस्तानला मात देऊ शकतात असे भारतीय चाहते म्हणत आहेत. 

कानेरियाने नेमकं काय म्हटलंपाकिस्तानचा माजी फिरकीपटू कानेरियाने विराटच्या खराब फॉर्मवर भाष्य केले. कोहली मागील मोठ्या कालावधीपासून मोठी खेळी करू शकला नाही. जवळपास ३ वर्षांपासून त्याला एकही शतकी खेळी करता आली नाही. त्याने कर्णधारपद देखील सोडले आहे. बोर्डाच्या बाबतीत काही वादही बाहेर आले, आता या गोष्टींमधून बाहेर पडून फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याने चांगले प्रदर्शन केले तरच त्याला पुढे खेळता येणार आहे, असे दानिशने म्हटले. तसेच विराट कोहलीची जागा भरून काढण्यासाठी भारतीय संघाला खेळाडूंवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याशिवाय विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्रांती दिल्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे कानेरियाने अधिक सांगितले.

२७ ऑगस्टपासून रंगणार थरारआशिया चषक २०२२ चे आयोजन २७ ऑगस्टपासून होणार आहे. ही स्पर्धा यूएईच्या धरतीवर पार पडणार असून ११ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेचा थरार रंगेल. पहिला सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये होईल. तर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहे, हा सामना २८ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान.  

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर. 

 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानभारतएशिया कपटी-20 क्रिकेटविराट कोहली
Open in App