Join us  

पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यावर टीम इंडियाची 'पूल पार्टी'; रोहित विराटचा डान्स, पाहा Video

विराटच्या शतकानिमित्त 'केक कटिंग'बद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:47 PM

Open in App

IND vs PAK, Virat Kohli Rohit Sharma : भारतीय संघाने पाकिस्तान विरूद्धचा बहुप्रतिक्षित सामना मोठ्या फरकाने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना रविवारी भारताने १४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सामना सुरू झाला, तेव्हा विराट कोहली आणि केएल राहुल या दोन शतकवीरांनी नाबाद राहत भारताला ३५० पार मजल मारून दिली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी पाकिस्तानला सुरूवातीच्या काळात धावा करून दिल्या नाहीत. त्यानंतर शार्दूल ठाकूर, हार्दिक पांड्या जोडीनेही चांगली कामगिरी केली. तर कुलदीप यादवने ५ बळी घेत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. भारताने वन डे इतिहासात पाकिस्तानावर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. या विजयानंतर भारताने पूल पार्टी एन्जॉय केला.

BCCI ने ट्विट केला व्हिडीओ

टीम इंडियाने पाकिस्तानवर मिळवलेला विजय साजरा करण्याचा भारताकडे वेळ नव्हता. भारताने नियोजित दिवसाऐवजी दुसऱ्या दिवशी सामना जिंकला. त्यामुळे आता भारताला लगेच आज श्रीलंकेशी दुसरा सामना खेळायचा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटर हॉटेलवर गेले आणि तेथेच त्यांनी आपला विजय साजरा केला. बीसीसीआयने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये भारतीय संघ विजय साजरा करताना दिसतो आहे. सुरूवातीला व्हिडीओत सामन्यातील काही क्षण आहेत. त्यानंतर खेळाडू हॉटेलवर परतताना दिसतात. पण त्यानंतर मात्र सेलिब्रेशनला सुरूवात होते. सुरूवातीला खेळाडू पूल पार्टी करताना दिसतात. स्विमिंग पूलमध्ये रोहित शर्माविराट कोहली डान्स करताना दिसतात. त्याशिवाय विराट कोहलीच्या शतकाचे सेलिब्रेशन करण्यासाठी केकही कापल्याचा व्हिडीओमध्ये दिसते. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघासाठी अनेक जमेची बाजू असल्याचे दिसले. सर्वप्रथम लोकेश राहुल दुखापतीनंतर मैदानात परतला. त्याने दमदार खेळी केली. शतक ठोकत त्याने त्याची तंदुरूस्ती साऱ्यांना दाखवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने देखील वन डे सामन्यात आपली तंदुरूस्ती दाखवून दिली. सुरूवातीच्या षटकात त्याची लाइन & लेंग्थ अप्रतिम आणि अचूक होती. त्याच्या फिटनेसचे खुद्द माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरनेही कौतुक केले.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुल