Join us  

IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांसाठी डिनर पार्टी; BCCIचे सर्व अधिकारी राहणार उपस्थित

India vs Pakistan ICC ODI World Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 9:01 PM

Open in App

India vs Pakistan ICC ODI World Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे आणि एक लाखांहून अधिक प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित राहणार आहेत. हॉटेल्स बुक झाले आहेत... इतकेच काय हॉटेल रुम मिळेनासे झाल्याने चाहत्यांनी हॉस्पिटलच्या खाटा बूक केल्या आहेत. या सामन्यापूर्वी बॉलिवूडमधील कलाकार आणि गायक परफॉर्म करणार आहेत. तसेच बड्या बड्या हस्तीही उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झाका अश्रफ ( PCB chief Zaka Ashraf) हेही ही मॅच पाहण्यासाठी अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत.

भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानंतर याच झाका अश्रफ यांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची भाषा केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा सर्वश्रुत आहे. ट्वेंटी-२० आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने १३-१ अशा फरकाने पाकिस्तानविरुद्ध मजबूत आघाडी घेतली आहे. २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने एकमेव विजय मिळवला होता आणि भारताचा सलग १२ विजयांची मालिका खंडित केली होती. यासाठी त्यांना २९ वर्षांची वाट पाहावी लागली. 

भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू असताना बीसीसीआयच्या आणखी एका कृतीने चाहते नाराज झाले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची भाषा करणाऱ्या अश्रफ यांच्यासाठी बीसीसीआयने डिनर पार्टी आयोजित केल्याचे वृत्त काही मीडियाने दिले आहे. PCBकडून याला दुजोराही मिळाला आहे. या वृत्तानुसार या डिनर पार्टीत बीसीसीआयचे सर्व अधिकारी आणि सरकारमधील काही अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे समजतेय.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआय