India vs Pakistan, Champions Trophy 2025 नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाच्या जर्सीवर यजमान पाकिस्तानचे नाव लिहिण्यास बीसीसीआयने नकार दिल्याचे वृत्त पुढे येताच नवा वाद सुरू झाला. २०१७ नंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले; परंतु भारतीय संघाने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्यामुळे पीसीबीने हायब्रिड मॉडेल मान्य केले. भारताचे सामने दुबईत होणार आहेत. यजमान पाकचे नाव जर्सीवर लिहिणार नसल्याचे बीसीसीआयने कळविताच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खवळले आहे. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होईल. भारत अ गटात पाकिस्तान, बांगलादेश व न्यूझीलंड यांचा सामना करणार आहे.
जर्सीवर पाकिस्तान लिहिण्यास बीसीसीआयचा विरोध आहे. पीसीबीने बीसीसीआयवर खेळात राजकारण आणत असल्याचा आरोप केला. त्यांनी पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला, ते त्यांच्या कर्णधाराला उद्घाटनाला पाठवत नाहीत आणि आता त्यांना जर्सीवर पाकिस्तान लिहायचे नाही,' असे पीसीबीने म्हटले.