Join us  

IND vs PAK: "आधी तुम्ही तुमची प्लेइंग XI शोधा", शोएब अख्तरने भारतीय संघावर साधला निशाणा

शोएब अख्तरने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 3:23 PM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) झालेल्या सामन्यावर भाष्य केले आहे. रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात अखेरच्या षटकात पाकिस्तानने विजय मिळवला. भारतीय संघाने खराब प्लेइंग इलेव्हन निवडली असल्याचा आरोप करत अख्तरने टीका केली आहे. तो म्हणाला की, प्रथम भारताला आपली प्लेइंग इलेव्हन फायनल करावी लागेल. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तीन बदलांसह उतरला होता. 

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, "एक तर हिंदुस्थानने अंतिम इलेव्हन निवडायचे की नाही हे ठरवू द्या, तुमचे भविष्य काय आहे, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा किंवा रवी बिश्नोई. तुमची अंतिम इलेव्हन कोणती आहे. आधी तुम्ही तुमची प्लेइंग इलेव्हन शोधा. मला भारताची संघनिवड गोंधळलेली दिसत आहे. मला समजत नाही की इतकी गोंधळलेली निवड का आहे?", अशा शब्दांत अख्तरने भारताच्या संघ निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

पाकिस्तानी संघाचे केले कौतुक दरम्यान, भारताविरूद्धच्या विजयानंतर शोएब अख्तरचा सूर बदलला असून तो पाकिस्तानी संघाचे विशेष कौतुक करत आहे. पाकिस्तानी संघाचे कौतुक करताना त्याने म्हटले, "पाकिस्तानच्या संघात बाबर आझमने खेळी केली नाही तर मोहम्मद रिझवान खेळी करतो. भारताचे मला काहीच समजत नाही की त्यांना कशा प्रकारे क्रिकेट खेळायचे आहे, कारण जो कोणी येतोय तो फक्त मोठे फटकार मारत आहे. सूर्यकुमार यादव, के.एल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा हे येताच मोठे फटकार खेळण्यास सुरूवात करतात. त्यामुळे संघाला विचार करण्याती गरज आहे की याचा विचार कोण करणार."

 

 

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानशोएब अख्तररोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App