नवी दिल्ली : आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) सर्व संघ यूएईत दाखल झाले आहेत. भारतीय संघ देखील 2 दिवसांपासून यूएईच्या धरतीवर सराव करत आहे. स्पर्धेचे प्रबळ दावेदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) रविवारी 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. दोन्हीही संघाचे खेळाडू एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) विराट कोहली आणि शाहिन आफ्रिदीच्या संवादाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दोन्ही दिग्गजांचा संवाद स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. विराट आणि शाहिनची ग्रेट भेट दरम्यान, व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, विराट कोहली पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या दुखापतीची विचारपूस करत आहे. यानंतर शाहिनने असे काही बोलले ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. क्रिकेटच्या मैदानावर नेहमी संघर्ष करणारे दोन्ही देशातील दिग्गजांनी स्पिरीट ऑफ क्रिकेटचे एक उदाहरण दाखवून दिले आहे. कोहली मागील मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे, तर शाहिन दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर गेला आहे. आफ्रिदी या व्हिडीओमध्ये विराटला म्हणतो, "तू लवकरच फॉर्ममध्ये यावे यासाठी मी प्रार्थना करत आहे." त्यामुळे शाहिन आणि विराटच्या या संवादाने अवघ्या क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. विराट मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.