Join us

Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर! कुठे रंगणार IND vs PAK सामना, जाणून घ्या

ICC Champions Trophy 2025 Full Schedule Announced: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे, ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळली जाणार आहे. त्यामुळे यजमान असलेला पाकिस्तानचा संघदेखील भारताशी सामना खेळायला पाकिस्तानातून बाहेर येईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:54 IST

Open in App

ICC Champions Trophy 2025 Full Schedule Announced: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अखेर आज जाहीर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जाणार आहेत. भारताचा अ गटात समावेश करण्यात आला असून भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामनादेखील कुठे खेळवला जाणार, याचीही माहिती स्पष्ट झाली आहे. जाणून घ्या सविस्तर

स्पर्धेतील भारताचे सामने कधी आणि कुठे?

  • २० फेब्रुवारी- भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
  • २३ फेब्रुवारी- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
  • ०२ मार्च- भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ८ संघांचा समावेश असून एकूण १५ सामने होणार आहेत. संघांची २ गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच (गट-अ) आहेत. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.

अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेशब गट- दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक

१९ फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची२० फेब्रुवारी- भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई२१ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची२२ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर२३ फेब्रुवारी- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई२४ फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी२५ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी२६ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर२७ फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी२८ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर१ मार्च- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची२ मार्च- भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई

सेमीफायनल

४ मार्च- उपांत्य फेरी-१, दुबई५ मार्च- उपांत्य फेरी-२, लाहोर

फायनल

९ मार्च- अंतिम सामना, लाहोर (मात्र, भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास हा सामना दुबईत खेळवला जाईल.)

राखीव दिवसाची तरतूद

१० मार्च - राखीव दिवस (९ तारखेला सामना पूर्ण होऊ शकला नाही तर एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ