IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी; आशिया चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर, India vs Pakistan लढत या दिवशी

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 06:34 PM2023-07-04T18:34:56+5:302023-07-04T18:35:46+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK : India A squad for ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 announced, Yash Dhull captain, check India A fixtures | IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी; आशिया चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर, India vs Pakistan लढत या दिवशी

IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी; आशिया चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर, India vs Pakistan लढत या दिवशी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयने ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 स्पर्धेसाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे. १३ ते २३ जुलै या कालावधीत श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत आशियातील ८ संघ खेळणार आहेत.  


भारत अ संघाला ग्रुप बीमध्ये नेपाळ, संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तान अ  यांच्यासोबत स्थान दिले गेले आहे. तर ग्रुप एमध्ये श्रीलंका अ, बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ आणि ओमान अ यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना ग्रुप ए मधील टॉपर आणि ग्रुप बी मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रुप बीमधील अव्वल आणि ग्रुप ए मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघात होईल. हे सामने २१ जुलैला खेळवण्यात येतील आणि २३ जुलैला फायनल होईल.  


भारत अ संघ - साई सुदर्शन, अभिषेक शर्मा ( उप कर्णधार), निकिन जोस, प्रदोश रंजन पॉल, यश धुल ( कर्णधार), रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग ( यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल, मानव सुतार, युवराजसिंह दोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितिश कुमार रेड्डी, राज्यवर्धन हंगर्गेकर ( India A squad: Sai Sudharsan, Abhishek Sharma (VC), Nikin Jose, Pradosh Ranjan Paul, Yash Dhull (C), Riyan Parag, Nishant Sindhu, Prabhsimran Singh (wk), Dhruv Jurel (wk), Manav Suthar, Yuvrajsinh Dodiya, Harshit Rana, Akash Singh, Nitish Kumar Reddy, Rajvardhan Hangargekar) राखीव खेळाडू - हर्ष दुबे, नेहाल वढेरा, स्नेल पटेल, मोहित रेडकर ( Standby list of players: Harsh Dubey, Nehal  Wadhera, Snell Patel, Mohit Redkar) 


भारत अ संघाचे वेळात्रक ( India A fixtures )
१३ जुलै - भारत अ वि. संयुक्त अरब अमिराती अ
१५ जुलै - भारत अ वि. पाकिस्तान अ
१८ जुलै - नेपाळ अ वि. भारत अ

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results


 

Web Title: IND vs PAK : India A squad for ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 announced, Yash Dhull captain, check India A fixtures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.