दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात पुन्हा भारताने बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीनं भारताच्या विजयाचा भक्कम पाया उभारला.
या विजयात गोलंदाज जसप्रीत बुमराने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 10 षटकांत 29 धावा देत 2 विकेट घेतल्या. यॉर्कर आणि पेसमध्ये वेरिएशनमुळे बुमरा ओळखला जातो आणि रविवारी त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगलेच चकवले. पण, त्याने टाकलेला एक चेंडू अनुभवी महेंद्रसिंह धोनीलाही थक्क करणारा ठरला.
डावाच्या तिसऱ्या षटकात बुमरा गोलंदाजीला आला आणि त्याच्यासमोर पाकिस्तानचा इमाम उल हक फलंदाजी करत होता. बुमराने याच षटकात टाकलेला दुसरा चेंडू फलंदाजाला चकवा देणारा होता. यष्टिमागे उभा असलेल्या धोनीलाही या चेंडूचा अंदाज बांधता आला नाही. चेंडू अडवल्यानंतर तो चक्क जमिनीवर कोसळला. पाहा व्हिडिओ...