IND vs PAK: पाकिस्तानने २३ ऑक्टोबरला होणारा भारताविरूद्धचा सामना खेळू नये - कामरान अकमल

टी-२० विश्वचषकात रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 07:45 PM2022-10-21T19:45:12+5:302022-10-21T19:46:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK Kamran Akmal says that Pakistan should not play the match against India on 23 October | IND vs PAK: पाकिस्तानने २३ ऑक्टोबरला होणारा भारताविरूद्धचा सामना खेळू नये - कामरान अकमल

IND vs PAK: पाकिस्तानने २३ ऑक्टोबरला होणारा भारताविरूद्धचा सामना खेळू नये - कामरान अकमल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. मात्र या बहुचर्चित सामन्यापूर्वीच दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली होती. अशातच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी देखील बीसीसीआयवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, रविवारी होणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने सहभागी होऊ नये असे माजी खेळाडू कामरान अकमलने म्हटले आहे. "मला वाटते की जय शाह यांचे हे विधान अनपेक्षित होते, त्यांनी आशिया चषकात भारत-पाकिस्तानचा लाईव्ह सामना पाहिला होता. त्यामुळे त्यांनी खेळात राजकारण न आणता ते दूर ठेवायला हवे." असे अकमलने अधिक म्हटले. 

पाकिस्तानने भारताविरूद्ध एकही सामना खेळू नये 
तसेच आशिया चषकाचे यजमानपद हे केवळ पाकिस्तानलाच मिळायला हवे आणि तसे झाले नाही तर पाकिस्तानने भारताविरुद्ध कोणत्याही स्तरावर खेळू नये. मग ते आयसीसी स्पर्धांचे सामने असोत, आशिया चषकाचे सामने असोत किंवा २३ ऑक्टोबरला होणारा विश्वचषकातील सामना असो, अशा शब्दांत कामरान अकमलने बीसीसीआयवर निशाणा साधला. बीसीसीआयने त्यांचे वक्तव्य मागे घेतले नाही तर पाकिस्तानने भारताविरूद्ध एकही सामना खेळू नये असेही अकमलने म्हटले आहे. 

२०२३ मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा 
- आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
- आयसीसी १९ वर्षांखालील मुलींची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
- आशिया चषक २०२३, पाकिस्तान
- आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत

टी-२० विश्वचषक २०२२ ची सुपर-१२ फेरी 
गट १
- अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड. 

गट २ - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅंड, झिम्बाब्वे, 

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
२७ ऑक्टोबर - भारत वि. नेदरलॅंड, १२.३० वाजल्यापासून, सिडनी
३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, ४.३० वाजल्यापासून, पर्थ
२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, १.३० वाजल्यापासून, अॅडलेड
६ नोव्हेंबर - भारत वि. झिम्बाब्वे, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs PAK Kamran Akmal says that Pakistan should not play the match against India on 23 October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.