Join us  

चेन कुली की मेन कुली.. 'तांत्रिक' पांड्या.. काला जादू..; हार्दिकच्या फोटोवरून भन्नाट मीम्स व्हायरल

Hardik Pandya IND vs PAK: हार्दिकने इमाम उल हकची विकेट घेण्याआधी घडला मजेशीर प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 4:26 PM

Open in App

Hardik Pandya, World Cup 2023 IND vs PAK Live: क्रिकेट विश्वचषकातील सर्वात मोठा महामुकाबला सध्या अहमदाबादमध्ये सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात खेळत आहे. सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानी फलंदाजांना सुरुवात चांगली मिळाली पण त्यानंतर दोनही सलामीवीर मोठी खेळण्यात अयशस्वी ठरले. मोहम्मद सिराजने अब्दुल्ला शफिकला तर हार्दिक पांड्याने इमाम उल हकला माघारी धाडले. इमामच्या विकेटच्या आधी घडलेला एक किस्सा आणि हार्दिकची ती कृती सध्या तुफान चर्चेत आहे. तसेच त्याच्या त्या कृतीवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्सदेखील व्हायरल होताना दिसत आहेत.

पाकिस्तानने डावाची सुरूवात चांगली केली. पण डावाच्या आठव्या षटकात सिराजने शफिकला माघारी पाठवले. त्यानंतर इमाम उल चांगलाच सेट झाला होता. त्याने डावाच्या १३व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर हार्दिकला चौकार लगावला. पण पुढच्याच चेंडूवर हार्दिकने त्याला बाद केले. रिप्लेमध्ये असे दिसून आले की विकेट वाला चेंडू टाकण्याआधी हार्दिक हातात चेंडू धरून काही तरी करत होता. तो तोंडाने काहीतरी पुटपुटत होता. त्याबद्दलचा फोटो व्हायरल झाला असून त्यावेळी हार्दिकने काही मंत्र म्हटला असं काहींचे म्हणणे आहे. काहींनी हार्दिकला मजेमजेत तांत्रिक म्हटले आहे. काहींना हार्दिकने चेंडूवर थुंकी लावल्याचाही संशय आहे. पाहूया याबद्दलचे मीम्स-

--

--

--

--

--

--

--

--

चेंडूला थुंकी लावल्याचा संशय

दरम्यान, भारतीय संघात आज सलामीवीर शुबमन गिलचे पुनरागमन झाले. पहिल्या दोन सामन्यात त्याला संघात स्थान नव्हते. डेंग्यूची लागण झाल्याने तो संघाबाहेर होता. आज त्याला संघात स्थान मिळाले असून त्याला इशान किशनच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. अश्विनला संघात स्थान देण्यात अशी अनेकांना आशा होती. पण कुलदीप यादव आणि शार्दुल दोघांनाही संघात स्थान असल्याने अश्विनला बाकावरच बसावे लागले आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानहार्दिक पांड्याअहमदाबादपाकिस्तानसोशल मीडिया