अहमदाबाद: वन डे विश्वचषकात शनिवारी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. या बहुचर्चित सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडेल. या मोठ्या सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी चाहत्यांनी काही महिन्यांपासूनच तिकिटांची खरेदी करण्यास सुरूवात केली होती. अशातच अहमदाबादमध्ये तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. कारण IND vs PAK सामन्यासाठी २ हजारांच्या तिकिटांची ३० ते ३५ हजारांत विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. याआधी खोटी तिकिटे वाटणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. आता सामन्याची तिकिटे मिळण्याची शक्यता फारच कमी आहे किंबहुना तिकिटेच उरली नाहीत. याचाच फायदा घेत काळाबाजार करणाऱ्यांनी चाहत्यांना लुटण्यास सुरूवात केली. चाहत्यांना कोणत्याही परिस्थितीत सामना पाहायचा असल्यामुळे ते जास्त किंमत मोजण्यास तयार होत आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.
वन डे विश्वचषकातील भारताचे पुढील सामने - भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू