Join us  

Ind Vs Pak, R Ashwin: 2 बॉल, 2 रन, समोर पाकिस्तान! आर अश्विन निवृत्तीची घोषणा करणार होता

पहिला बॉल वाईड होता तो, सोडला. दुसऱ्या बॉलवर रोलर कोस्टर फिनिश... सुटकेचा निश्वास सोडला... आर अश्विननेच याबाबत खुलासा केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:45 AM

Open in App

टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी झाला होता. या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत थरार पहायला मिळाला. यात अखेरच्या ओव्हरमध्ये हवे असलेले १६ रन्स आणि त्यानंतर पडलेली विकेट. आर अश्विनने विजयी फटका खेचला आणि भारताच्या पारड्यात विजय नोंद झाला. या अखेरच्या दोन बॉलवर आर अश्विनने मोठा खुलासा केला आहे. 

ही मॅच पाहून दिग्गज क्रिकेटरही थक्क झाले होते. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शने मस्करीतच या मॅचनंतर वर्ल्डकप थांबवावा असे म्हटले होते. मोहम्मद नवाज अखेरचे षटक टाकत होता. भारताला जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती. विजय टप्प्यात येत होता, परत जात होता. हार्दिक पांड्या आऊट झाला आणि दोन खेळाडूंचे करिअर पणाला लागले होते. 

शेवटच्या दोन चेंडूंवर जे काही घडले ते अश्विन कधीही विसरणार नाही. दिनेश कार्तिक फिनिशर म्हणून आला होता, पण रन आऊट झाला. कोहली होता, पण खालच्या क्रीझवर. अश्विनच्या हातीच आता सारे काही होते. अचानक अश्विनच्या मनात विचारांचे काहूर माजले. जिंकलो तर ठीक, पण हरलो तर काय? जबाबदारी माझीच असणार. जर भारताला विजय मिळवून दिला नाही तर ड्रेसिंग रुममध्ये आल्याआल्याच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार... यातच पहिला बॉल वाईड होता तो, सोडला. दुसऱ्या बॉलवर रोलर कोस्टर फिनिश... सुटकेचा निश्वास सोडला... आर अश्विननेच याबाबत खुलासा केला आहे. 

ही मॅच पाकिस्तानविरोधात होती. दुसरी कोणती असती तर एवढा फरक पडला नसता. कारण पाकिस्तानविरोधात हरणे म्हणजे टीकेला सामोरे जाणे. हृषिकेश कानिटकरसोबतच्या व्हिडीओ चॅटमध्ये अश्विनने गंमतीने जरी ही गोष्ट सांगितली तरी ती तेव्हाच्या परिस्थितीत गंमतीची नव्हती. ''जर नवाजचा तो चेंडू फिरून माझ्या पॅडवर आदळला असता तर मी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली असती. 'खूप खूप धन्यवाद, ही माझी क्रिकेटची कारकीर्द खूप छान होती आणि तुम्हा सर्वांचे आभार', असे लिहिले असते असे हसत हसत अश्विनने सांगितले.  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआर अश्विनट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App