IND vs PAK: लज्जास्पद! रोहित शर्माच्या पत्नीला लोकांनी घेरलं, रितिका घाबरली अन्...Video

वर्ल्ड कप स्पर्धेतील या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे कुटुंबीयही अहमदाबादला पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 06:50 PM2023-10-14T18:50:49+5:302023-10-14T18:51:03+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK: Shameful! Rohit Sharma's wife surrounded by people, Ritika Sajdeh was scared and...Video | IND vs PAK: लज्जास्पद! रोहित शर्माच्या पत्नीला लोकांनी घेरलं, रितिका घाबरली अन्...Video

IND vs PAK: लज्जास्पद! रोहित शर्माच्या पत्नीला लोकांनी घेरलं, रितिका घाबरली अन्...Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs PAK Live : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतील या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे कुटुंबीयही अहमदाबादला पोहोचले. विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा, कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या पत्नीही अहमदाबादमध्ये दिसल्या. दरम्यान, रितिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती थोडी घाबरलेली दिसत आहे. अहमदाबादमध्ये रितिकासोबत जे घडले ते अतिशय लाजिरवाणे असल्याचे सांगण्यात येत आहे.


मॅचपूर्वी लोकांनी सेल्फीसाठी रितिकाला घेरलं, त्यामुळे ती अस्वस्थ झाली. रितिकाला पाहताच चाहते तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावले. ३-४ चाहत्यांनी तिला घेरलं आणि सेल्फी काढायला सुरुवात केली. यादरम्यान ती थोडी घाबरलेली दिसली. यानंतर तिने पुढे जात सुटकेचा नि:श्वास सोडला. रितिकाच्या प्रतिक्रियेवरून ती किती अस्वस्थ झाली होती हे स्पष्टपणे दिसून येते. या व्हिडिओवर चाहते तिच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. युजर्सचे म्हणणे आहे की रितिका खूपच घाबरलेली दिसत होती. 

एका यूजरने म्हटले की, ती क्रिकेटर नाही आणि सेलिब्रिटीही नाही. ती क्रिकेटपटूची पत्नी आहे. त्यांना असे घेरायला नको. त्यांच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे. ती खूप अस्वस्थ झाली आहे. लोकांच्या या कृतीमुळे ती खूप घाबरली असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे.  

पाकिस्तानने अवघ्या ३६ धावांत ८ फलंदाज गमावले. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्यांदा पाच गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.  अब्दुल्लाह शफीक ( २०) आणि इमाम-उल-हक ( ३६) हे माघारी परतल्यानंतर बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी ८३ धावांची भागीदारी करुन पाकिस्तानला सावरले. पण, सिराजने अर्धशतकवीर बाबरचा ( ५०) त्रिफळा उडवला. सौद शकील ( ६) आणि इफ्तिखार अहमद ( ४) हे कुलदीपचे बळी ठरले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने रिझवानचा ( ४९) त्रिफळा उडवला आणि पाठोपाठ शादाब खानचीही ( २) दांडी गुल केली.  पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला.   
 

Web Title: IND vs PAK: Shameful! Rohit Sharma's wife surrounded by people, Ritika Sajdeh was scared and...Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.