भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील महामुकाबला होणार आहे. उद्याचा दिवस टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. या सामन्याची सध्या चर्चा सुरू आहे. अनेक माजी क्रिकेट खेळाडूंनी टीम इंडियाला सल्ला दिला आहे. माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही मोलाचा सल्ला दिला आहे.
शाहीन शाह आफ्रिदी हा जगातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्यासमोर भारतीय फलंदाजांनी सरळ खेळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा सल्ला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारतीय खेळाडूंना दिला. आज सचिन तेंडुलकरने एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली, यावेळी त्याने पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रदी संदर्भात त्याची निरिक्षणे नोंदवली.
तुम्ही आता खेळपट्टीवर असता तर शाहीनचा सामना कसा केला असता, असा प्रश्न सचिनला विचारला. यावेळी सचिनने स्मितहास्य देत उत्तर दिले. म्हणाला, मी त्याच्याशी सामना करणार नाही हे मला माहिती आहे.त्यामुळे मी मनाची तशी तयारी नाही केली. पुढे त्याने भारतीय खेळाडूंना शाहीन संदर्भात सल्ला दिला.
"शाहीन हा आक्रमक गोलंदाज आहे आणि त्याला विकेट्स घ्यायला आवडतात. तो चेंडू खेळपट्टीवर जोरात आपटतो आणि बॉल स्विंग करतो. तो फलंदाजाला बाद करु शकतो. त्यामुळे त्याच्यासोबत सरळ आणि 'V' मध्ये खेळण्याची रणनीती असावी," असा सल्ला तेंडुलकरने दिला.
शाहीन वेगात उजव्या बाजूने चेंडू टाकतो. त्याच वेगाने त्याची रेषा पकडली पाहिजे. फलंदाजाने बॉल खेळण्यासाठी तयार राहिले पाहिजे. जर तुम्ही बॉल खेळण्यासाठी तयार नसाल तर ते एकतर फ्रंट-फूट किंवा बॅकफूटवर असू शकते.
"कारण एकदा तुम्ही बॅकफूटवर गेलात की, तुम्ही पुढ येऊ शकत नाही आणि उलट. त्यामुळे चेंडू खेळण्यासाठी तयार असालयला हवे. "प्रत्येक चेंडूवर एक प्रकारची हालचाल पाहिजे, असा निष्कर्ष,तेंडुलकरने काढला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत.